केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कायदा लागल्यामुळे देशभर त्याचे पडसाद उमटू लागले असून, शहरातील जयस्तंभ चौक येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय काळे, माजी आमदार केवलराम काळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्मिता लहाने, माजी सभापती देवेंद्र पेटकर, अचलपूर तालुकाध्यक्ष गजानन खांडोकार, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष बाळासाहेब खडके, शहराध्यक्ष सल्लूभाई, स्टेला जंवजाळ, सुषमा थोरात, मनीषा शिंगणे, आशा गोटे, सारिका बर्वे, साधना कोकाटे, मीना कोल्हे, राजकन्या सिंगरोल, तोशल चित्रकार, नीलेश राऊत, आकाश खैरकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय कृषी विधेयकाचा परतवाडा येथे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST