शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातून समृद्धी, नेरपिंगळाईत ७० वर्षांची साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:00 IST

गावाच्या विकासात लोकांनी एकत्र यावे, शेतकºयांनीही सक्षम व्हावे, नवे तंत्रज्ञानातून शेतीच्या विकासाचा मार्ग विस्तारण्याचा अनोखा प्रयोग अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देसहकार भूषण : शेतकऱ्यांसह नागरिकांच्या गरजा भागविणारी संस्था, राज्यात ठरली अव्वल

आॅनलाईन लोकमतनेरपिंगळाई : गावाच्या विकासात लोकांनी एकत्र यावे, शेतकऱ्यांनीही सक्षम व्हावे, नवे तंत्रज्ञानातून शेतीच्या विकासाचा मार्ग विस्तारण्याचा अनोखा प्रयोग अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे यशस्वी झाला आहे. येथील सेवा सहकारी सोयायटीने ७३ वर्षांत ‘सहकारातून समृद्धीकडे’ वाटचाल करून राज्यात नाव कमविले आहे. ही संस्था अमरावती जिल्ह्यासाठी भूषण ठरली.नेरपिंगळाईच्या या संस्थेची स्थापना १८ जुलै १९४४ रोजी गावकऱ्यांनी ‘नेरपिंगळाई क्रॉप लोन सोसायटी’ या नावाने केली. त्यावेळी या संस्थेमार्फत केवळ पीककर्ज देण्यात येत होते. १९५७ मध्ये संस्थेचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये रूपांतर झाले. शेतकऱ्यांना शेतीच्या गरजा पुरविणारी दुकाने काढण्यात आली. या दुकानांमधून सभासदांना कमी दरात उत्कृष्ट वस्तूंचा पुरवठा केला जातो. संस्था स्वनिधीवर व्यवसाय करीत आहे. नफ्यात असलेल्या या संस्थेचा अंकेक्षणाचा अ दर्जा बहाल करण्यात आला आहे.संस्थेचे आज रोजी १८३४ सभासद आहेत. संस्थेकडे पीक कर्जाशिवाय कोणतेही कर्ज नाही. संस्था दरवर्षी नफ्यात असून सभासदांना दरवर्षी १५ टक्के लाभांश देत आहे. संस्थेजवळ ३ कोटी ९४ लाखाहून अधिक रूपयांच्या ठेवी तर गुंतवणुकीचा आकडा ३ कोटी ४५ लाखांच्या घरात आहे.दोनदा मिळाला ‘सहकार भूषण’ पुरस्कारसंस्थेने स्थापनेपासून तो आतापावेतो केलेल्या उत्कृष्ट कामकाजाची पावती म्हणून संस्थेला सन २०१२ मध्ये महाराष्टÑ शासनाचा सहकार भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर २०१६ मध्ये पुन्हा महाराष्टÑ शासनाचा सहकार भूषण हा देण्यात आला आहे. राज्यात नामवंत व कार्यशिल म्हणून या संस्थेचा गौरव केला जातो.नागरिकांसाठी सहकारी दुकानेसोसायटीने गावात स्वस्त धान्य दुकाने, कृषी सेवा केंद्र, बचत व मुदती ठेव व्यवसाय, वेअर हाऊस, शेतमाल तारण व्यवसाय, हार्डवेअर दुकाने, कापड भांडार, किरकोळ तसेच घाऊक घासलेट व्यवसाय, सोने तारण व्यवसाय, लॉकर सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परिसरातील राजूरवाडी, लेहगाव, धामणगाव (काटपूर), अडगाव या गावात संस्थेने दुकानांच्या शाखा सुरू केल्या आहेत.सर्व संचालकांचे सहकार्य व सभासदांचा दृढ विश्वास यामुळे संस्था प्रगतीपथावर कार्य करीत आहे. ही परंपरा आम्ही कायम ठेवाण्याचा पूर्ण प्रयत्न करू.- संजय मंगळे,अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी नेरपिंगळाई