शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

पडताळणीत अडकले सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव

By admin | Updated: May 16, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या सोयाबीनला शासन अनुदान देणार आहे.

शेतकऱ्यांना मदत : अमरावती बाजार समितीमुळेच विलंबलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या सोयाबीनला शासन अनुदान देणार आहे. याविषयी अमरावती व्यतिरिक्त सर्व बाजार समित्यांचे अहवाल तयार आहेत. केवळ अमरावती बाजार समितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झालेले नाही.शासनाने नमूद केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत विक्री झालेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रूपये व २५ क्विंटल क्षेत्र मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शासनदेशानुसार १२ बाजार समित्यांमध्ये ४५ हजार प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावाची शासनाचे निकषानुसार पडताळणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील अमरावती व्यतिरिक्त सर्व बाजार समित्यांचे अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले आहे. केवळ अमरावती बाजार समितीचे प्रस्ताव प्राप्त नसल्याने जिल्ह्यासाठी पणन संचालकांकडून अनुदानाचे करोडो रूपये अडकून पडले आहेत.जिल्ह्यात या अनुदानासाठी अमरावती बाजार समिती वगळता १५ हजार ५१८ शेतकरी लाभार्थी आहेत. यामध्ये नांदगाव बाजार समितीत २८७०, चांदूररेल्वे १३०३, धामणगाव २५०३, तिवसा २७३, चांदूरबाजार १६७०, मोर्शी १२४५, वरूड ३७, दर्यापूर १३४२, अंजनगाव सुर्जी १७६५, अचलपूर १८४७ व धारणी येथील केंद्रावर ६६३ शेतकरी लाभार्थी आहेत. केवळ अमरावतीचे प्रस्तावांची पडताळणी झाली नसल्याने जिल्ह्याचे अनुदान रखडले आहे. पात्र शेतकऱ्यांचे २.२५ लाख क्विंटल सोयाबीनसोयाबीन अनुदानासाठी अमरावती वगळता जिल्ह्यातील ११ बाजार समितीमधील १५ हजार ५१८ शेतकऱ्यांचे २,२४,८२९.२९ क्विंटल सोयाबीन शासन अनुदानासाठी पात्र आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर ३१०५४.३०, चांदूररेल्वे १६१०३.३०, धामणगाव ५१२६४.४०, तिवसा ३३८२.१५, चांदूरबाजार २२७३९.३०, मोर्शी १४२४६.६०, वरूड ४५७.५४, दर्यापूर २०१०९.५०, अंजनगाव सुर्जी २५०७१.७०, अचलपूर २७९३९.८० व धारणी येथील १२४६०.७० क्विंटल सोयाबीन अनुदानासाठी पात्र आहे. अमरावती बाजार समितीला पत्र देण्यात आले आहे. तेथील प्रस्तावांची युद्धस्तर पडताळणी सुरू आहे. एक-दोन दिवसात पडताळणी पूर्ण होईल. जिल्ह्यास अद्याप अनुदान अप्राप्त आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थाजिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव असल्याने पडताळणीस थोडा विलंब आहे. सोमवार सायंकाळ पर्यंत ही प्रक्रिया होऊन जाईल व सहकार विभागाला सादर करण्यात येईल. - भूजंगराव डोईफोडे, सचिव, अमरावती बाजार समिती