शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

पाच बार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंट्सचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: October 20, 2016 00:13 IST

अवैध धंदे रोखण्यासाठी तयार करणाऱ्यात आलेल्या ‘स्ट्राईकिंग फोर्स’द्वारे मंगळवारी शहरातील विविध बिअरबार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटवर धाड टाकण्यात आली.

४७ ताब्यात : ‘स्ट्राईकिंग फोर्स’ ची कारवाईअमरावती : अवैध धंदे रोखण्यासाठी तयार करणाऱ्यात आलेल्या ‘स्ट्राईकिंग फोर्स’द्वारे मंगळवारी शहरातील विविध बिअरबार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटवर धाड टाकण्यात आली. यामध्ये विना परवाना दारू पिणाऱ्या ४७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त मंडलिक यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात ‘स्ट्राईकिंग फोर्स’ने अवैध व्यवसायांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. मंगळवारी रात्री सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, बळीराम डाखोरे व पंडागळे यांच्या नेतृत्वातील विविध पथकाने गार्डन ग्लोरी, यश बिअरबार, आरती बिअरबार, गोल्डन आर्क आणि शाल बिअरबारवर छापे मारले. तेथील परमीटरूमच्या बाहेर विनापरवाना दारू पिताना ४७ नागरिक पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले. मात्र, बिअरबारच्या संचालकांवर कलम ८२ नुसार परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे बार चालकांचे धाबे दणाणले आहेत. बार संचालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धावपोलीस विभागाकडून बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यासंदर्भात बार, हॉटेल तसेच रेस्टॉरेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. पोलीस विभागाकडून मनमानी पद्धतीने ही कारवाई केली जात असल्याने लाखो रूपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. शासकीय नियमांप्रमाणे व्यवसाय करीत असल्याचा दावा बार व्यावसायिकांनी केला असून याप्रकारे कारवाईचा अधिकार एक्साईजला आहे. मात्र, पोलीस विभाग अधिकारांचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोप असोसिएशनचा आहे. त्यामुळे या कारवाई तत्काळ थांबविण्यात याव्यात, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष लकी नंदा, सुरेश चांदवानी, सुशील पडोळे, गजानन राजगुरे, मदन जायसवाल, संजय छाबड़ा, नितिन जायसवाल, मंधार जायसवाल, रवी बागडे, कुलदीप भांबुरकर, अजय गुल्हाने, जीतेश साहू आदींनी केले आहे.