शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर योजनेची आज संपणार मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

अमरावती : मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीसाठी 'मालमत्ता कर ...

अमरावती : मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीसाठी 'मालमत्ता कर अभय योजना लागू करण्यात आली. दरम्‍यान फेब्रुवारीत पुन्‍हा लॉकडाऊन केल्याने नागरिकांना मालमत्‍ता कराचा भरणा करण्‍यास असुविधा निर्माण झाली होती. त्यामुळे ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याने या योजनेचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. थकबाकीदारांनी मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक २० टक्के दंडात्मक रकमेचा भरणा केल्यास त्यांना ८० टक्के प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळत आहे. मात्र, ही रक्कम व ८० टक्के सवलत वगळून उर्वरित २० टक्के दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरावयाची आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेला अभय योजना लागू राहणार नाही. अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रकमांना अभय योजना लागू राहणार नाही व अभय योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी अभय योजनेंतर्गत दावा करता येणार नाही.

अभय योजनेअंतर्गत महापालिका मुख्यालय, सर्व पाचही झोन कार्यालये तसेच सर्व भरणा केंद्रे या ठिकाणी रोख, धनादेश,धनाकर्ष याव्दारे रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.