शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा, काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:52 IST

अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला.

चिखलदरा (अमरावती), दि. 6 - अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. चार महिन्यांपासून मग्रारोहयोच्या कामाचे वेतन अप्राप्त असलेल्या आदिवासीने पती-पत्नीच्या कामाचा पुरावा म्हणून घरातील एका सुतळीला मारलेल्या हजेरीच्या गाठी घेऊन वेतनाची मागणी केली. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा अभाव आहे. येथील आदिवासी निरक्षर आहेत. त्यांना लिहिता-वाचता येत नाही. परिणामी सोयीनुसार सरळ पद्धतीचा उपयोग केला जातो. बामादेही ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या बागदरी येथील बिरजू लाभलाल उईके आणि त्याची पत्नी कुंदिया बिरजू उईके बागदरीसह परिसरात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सीसीटी पांदण रस्त्याचे काम केले. मागील चार महिन्यांपासून हे दाम्पत्य काम करीत असतानासुद्धा त्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांनी ही व्यथा बामादेही येथील ग्रामसभेत मांडली. या दाम्पत्याने किती दिवस काम केले, यावर चांगलाच वाद झाला. अनेक मजुरांचे वेतन न मिळाल्याने ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार झाला.आपण 16 आठवडे सपत्नीक मग्रारोहयोची कामे केल्याचा पुरावा असल्याचे बिरजू उईके या मजुराने ग्रामसभेपुढे सांगितले. बिरजू उईके यांच्याकडे लेखी पुरावा असल्याचा संशय गावक-यांना होता. मात्र, त्याने त्याच्या बांडीसच्या खिशातून काढून ग्रामसभेपुढे सादर केलेला पुरावा पाहून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने थक्क झाले. तो पुरावा म्हणजे एका सुतळीवर मारलेल्या गाठी होत्या. त्या सुतळीवर एकूण बत्तीस गाठी जवळ-जवळ मारल्या होत्या. अर्थात नवरा बायको दोघांनी काम केल्याचे बिरजूने उघड केले. सरपंच मुन्नी कास्देकर, उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे, सदस्य व गावक-यांनी या रोजगार सेवकावर झालेल्या अन्यायाची तक्रारच संबंधित अधिका-यांकडे केली आहे. ते काहीही असले तरी विज्ञान युगात सुतळीचा पुरावा मेळघाटात चर्चेचा विषय ठरला आहे. 

ग्रामसभेत बिरजू उईकेने 16 आठवडे पत्नीसह काम केल्याचा पुरावा म्हणून गाठी मारलेली सुतळी सादर केली. त्याच्यासह इतरही मजुरांचे वेतन न मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. - मिश्रीलाल झाडखंडे,उपसरपंच, बामादेही