आयोगाचे निर्देश : उमेदवारावर होणार गुन्हा दाखलमोहन राऊत धामणगाव रेल्वेजिल्ह्यातील नऊ नगरपरिषदेच्या निवडणुकीचे नामांकन भरण्याला तीन दिवसांनंतर सुरूवात होत असली तरी आतापासून आयोगाने आपली प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे़ उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केल्याचे आढळल्यास उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस तदनंतर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, शेंदुरजना घाट, अचलपूर, चादूररेल्वे, दर्यापूर, वरूड, मोर्शी, चांदूरबाजार या नगरपरिषदेच्या १९८ जागेकरिता २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे़ निवडणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून नऊही तालुक्यांत प्रशासन अलर्ट केले आहे़ संपत्तीची माहिती बंधनकारक सर्वसाधारण उमेदवारांना अर्ज भरताना १ हजार रूपये तर इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती या घटकातील उमेदवारांना अर्जासोबतच पाचशे रूपये भरावे लागणार आहे़ नामांकनाबरोबर मालमत्तेची माहिती, शौचालय असल्याचा दाखला, कर भरल्याची पावती, गुन्हेगारीविषयी शपथपत्र व जातवैधता प्रमाणपत्र विभागाकडे प्रकरण सादर केल्याची पावती जोडणे बंधनकारक आहे नामनिर्देशन, शपथपत्र संगणकामार्फत भरता येईल़ त्याकरिता गुगल डॉक, मोबाईल, अॅप, टू व्होटर्स, व्हॉटस अॅप, या प्रणालीचा वापर करता येणार आहे़सोशल मीडियावर करडी नजरउमेदवारी अर्ज ११ नोव्हेंबर रोजी मागे घेतल्यानंतर जे उमेदवार रिंगणात आहे़ त्या उमेदवारांच्या प्रचाराकडे निवडणूक आयोग आपले लक्ष केंद्रित करणार आहे़ आर्थिक बळाचा दुरूपयोग व मतदारांना देण्यात येणाऱ्या प्रलोभनावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर येणाऱ्या पेड सोशल कमेंटवर करडी नजर ठेवली आहे़ एखांद्या उमेदवाराचा या सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरू असेल आणि मतदारांनी तक्रार केली तर प्रथमदर्शनी उमेदवाराला कारणे दाखवा नोटीस चौकशीनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे़एक हजार बॅलेट युनिटयंदा थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार असल्याने बॅलेट युनिटची संख्या वाढली आहे़ अचलपूर नगरपरिषदेच्या ११० मतदान केंद्रांवर ३२० बॅलेट युनिट व १६५ कंट्रोल युनिट लागणार आहेत़ अंजनगाव सुर्जी येथे बॅलेट युनिट ११०, शेंदूरजना घाट २५, धामणगाव रेल्वे १००, चांदूररेल्वे ५५, दर्यापूर १६५, वरूड १००, मोर्शी ९६, चांदूर बाजार ६० असे १ हजार ३१ बॅलेट युनिट लागणार असून निवडणूक प्रशासनाने आतापासून तयारीला सुरूवात केली आहे़
सोशल मीडियावर उमेदवारांना प्रचारबंदी
By admin | Updated: October 24, 2016 00:12 IST