लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे या काळात आवश्यक सेवा वगळता झेडपी प्रशासनाचा कारभार ठप्प झाला आहे. दरवर्षी मे महिन्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होते. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी कमी झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की त्यांची इतकी चर्चा होते की, थेट मंत्रालयापर्यंत हा विषय पोहोचविला जातो. मंत्रालयातील मंत्री व सचिवांना देखील याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची वेळ दरवर्षी येत असते. शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत शिक्षकांचे समाधान होईल, असे नियमांत आले नसल्याची ओरड दरवर्षी शिक्षकांकडून होत असते. त्यामुळे दरवर्षी शिक्षकांच्या प्रक्रियेबाबत नवीन नियम जिल्हा परिषदेला मिळत असतात. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीने करण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रणालीतही अनेक दोष असल्याची ओरड सुरू झाली होती. त्यानंतर पुन्हा शिक्षकांच्या बदल्यांबाबत सातत्याने नियमात बदल होत राहिले. राज्यात सत्तांतर झाले आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांबाबतीत पण नव्याने आदेश व नवीन नियमावली घेण्याची शक्यता अनेक शिक्षकांना वाटत होती. मात्र, मागील दोन महिन्यापासून राज्य शासनाने संपूर्ण लक्ष कोरोनाविरुद्ध लढाईत राहिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा विषय हा गौण ठरला आहे. जून महिन्यात नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होते. तत्पूर्वी दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जूनमध्ये किंवा त्यानंतरच्या दोन महिन्यांत होईल की, नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा विषय आता मागे पडला आहे.बदलीसाठी प्रयत्न सुरूच !कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषद शाळांचे योगदानही प्रशासकीय यंत्रणेकडून घेण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला राज्य शासनाद्वारे याबाबत स्वतंत्र धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे बदली होईल तेव्हा होईल; मात्र त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात काही शिक्षकांनी आतापासूनच प्रयत्न करताना दिसत आहेत.
शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST
दरवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की त्यांची इतकी चर्चा होते की, थेट मंत्रालयापर्यंत हा विषय पोहोचविला जातो. मंत्रालयातील मंत्री व सचिवांना देखील याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची वेळ दरवर्षी येत असते. शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत शिक्षकांचे समाधान होईल, असे नियमांत आले नसल्याची ओरड दरवर्षी शिक्षकांकडून होत असते.
शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया लांबणीवर
ठळक मुद्देअनेकांचा हिरमोड : कोरोनामुळे प्रशासनाची धावपळ थांबली