शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

‘सायबर टेक’विरुद्धचा ‘एफआयआर’ लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 22:58 IST

महापालिकेच्या तिजोरीला १.३३ कोटी रुपयांनी चुना लावणाऱ्या सायबरटेक कंपनीविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्यास पालिकेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

ठळक मुद्देविधी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : चौकशी अहवालाने प्रशासकीय खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या तिजोरीला १.३३ कोटी रुपयांनी चुना लावणाऱ्या सायबरटेक कंपनीविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्यास पालिकेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. एकट्या कंपनीविरोधात एफआरआर दाखल केल्यास तो ‘स्ट्राँग’ ठरणार नाही, अशा निष्कर्षाप्रत महापालिकेचा विधी विभाग पोहोचल्याने ‘एफआयआर’ केव्हा, हे पाच दिवसानंतरही अनुत्तरित आहे. २ एप्रिलला आयुक्तांनी सायबरटेक विरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले होते.महापालिका क्षेत्रातील विविध माहितीचे जीआयएस सर्वेक्षण करून डेटाबेस निर्माण करणे व डिजिटायजेशन करण्याचे कंत्राट ठाण्याच्या सायबर टेक कंपनीला देण्यात आले. त्यासाठी तत्कालीन आयुक्त नवीन सोना यांच्या स्वाक्षरीने २०१२ मध्ये करारनामा करण्यात आला. त्या कामापोटी सायबर टेकला १.३३ कोटी रुपये प्रदान करण्यात आले. मात्र, या देयकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. कुठलेही काम न करता या कंपनीला देयके अदा केल्याने हा खर्च निष्फळ ठरल्याचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने काढला. उपायुक्त महेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानुसार १.३३ कोटींच्या ठरविण्यात आले, तर उर्वरित १२ जणांकडूनही ५० टक्के रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचवेळी कुठलेही काम न करता किंवा काम करण्याच्या मानसिकताच नसल्याचा ठपका ठेवत सायबरटेकविरुद्ध फसवणुकीसंदर्भात फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आलेला नव्हता. तो नोंदविण्यात तांत्रिक अडचण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी त्यामागील गोम वेगळीच आहे.कंपनीसह कर्मचारीही दोषीफायबर टॉयलेट व हायड्रोलिक आॅटो प्रकरणामध्ये संबंधित कंपन्यांसह महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्या धर्तीवर सायबरटेकला देयके काढून देणारे दोषी नव्हे का? की सायबरटेकने १.३३ कोटींचा धनादेश वेगळ्या मार्गाने मिळविला? तसे नसल्यास सायबरटेकसह संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्धही फौजदारी तक्रार नोंदविणे कायदेसंगत आहे. यात खडेकर यांच्याविरोधात फौजदारी होऊ नये, यासाठी एक गट कामाला लागला आहे. एफआयआर न होण्यामागे ही खरी गोम आहे.विधी अधिकारी म्हणतात, संचालक शोधतोय!आयुक्तांनी जरी सायबरटेक विरोधात तक्रार नोंदविण्याचे निर्देश दिले असले तरी कंपनीविरुद्ध नव्हे, तर त्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध तक्रार करण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे सायबरटेकच्या नेमक्या कुणाचे नाव एफआयआरमध्ये नोंदवायचे, हे निश्चित झाली नसल्याने शुक्रवारी एफआयआर नोंदविण्यात आल्याचे मत विधी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक, सायबरटेकच्यावतीने करारनाम्यामध्ये कंपनी प्रतिनिधी म्हणून स्वाक्षरी करणारी व्यक्ती जाहीर आहे. त्यामुळे विधी अधिकाऱ्याला ते शोधण्यात इतका वेळ का लागतोय, हे अनाकलनीय आहे.