शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

कोविडमुळे अनाथ बालकांचे तीन वर्षांचे शैक्षणिक शुल्क ‘प्रोजेक्ट मुंबई’ भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्य शासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या आदी सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अशातच त्यांचे शिक्षण, मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासनाने हाती घेतली आहे. प्रोजेक्ट मुंबई या संस्थेने शिक्षण शुल्काची जबाबदारी घेतली. जिल्ह्यातील ३७ बालकांचे शैक्षणिक शुल्क या संस्थेने अदा केले आहे. अनाथ बालकांच्या मदतीसाठी प्रोजेक्ट मुंबई तसेच इंडियन सायकियाट्रिक सोसायटी या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून या मुलांना शैक्षणिक साधनेही पुरविण्यात येणार आहेत, असे  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे सांगितले.कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्य शासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या आदी सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अशातच त्यांचे शिक्षण, मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. प्रोजेक्ट इंडिया व इंडियन सायकियाट्रिक सोसायटीसमवेत सामंजस्य करार करण्यात आला असून, प्रोजेक्ट मुंबई संस्थेद्वारे कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या राज्यातील बालकांचे पुढील तीन वर्षाचे शैक्षणिक शुल्क बालकांच्या नावे थेट शैक्षणिक संस्थेत जमा करण्यात येईल. त्यानुसार यंदाचे शुल्क जमा झाले आहे. शिक्षणासाठी आवश्यकतेप्रमाणे ॲण्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप, सायकल आदी बाबी पुरवण्यात येणार आहेतपहिल्या टप्प्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत पुरवण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात एक पालक गमावलेल्या बालकांनाही मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संस्थेने १८००, १०२, ४०४० हा समर्पित टोल फ्री क्रमांक सुरू केला असून संकटग्रस्त बालकांनी मदतीसाठी यावर संपर्क साधल्यास त्यांना तातडीने मदत पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रोजेक्ट इंडियाचे शिशिर जोशी यांनी सांगितले.

समुपदेशनासाठी सहकार्यबालकांच्या समुपदेशनासाठी इंडियन सायकियाट्रिक सोसायटीचे सहकार्य मिळाले आहे. पालक गमावलेल्या बालकांवर मोठा आघात झालेला असतो. त्यांचे मानसिक पुनर्वसन करणे आव्हानात्मक असून त्यासाठी या बालकांशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याचे प्रशिक्षण इंडियन सायकियाट्रिक सोसायटीशी संलग्न मानसोपचार तज्ज्ञ हे महिला व बालविकास विभागाचे जिल्हास्तरीय समुपदेशकांना देत आहेत. या बालकांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक पुनर्वसन आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने एकात्मिक पद्धतीने काम संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरEducationशिक्षण