शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अंजनसिंगीतून प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

पान १ कृषी विभागाचे धाडसत्र : खरिपाच्या तोंडावर तस्कर सक्रिय, १५ लाखांचा मुद्देमाल धामणगाव रेल्वे/तिवसा : धामणगाव रेल्वे ...

पान १

कृषी विभागाचे धाडसत्र : खरिपाच्या तोंडावर तस्कर सक्रिय, १५ लाखांचा मुद्देमाल

धामणगाव रेल्वे/तिवसा : धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथून सुमारे १४ लाख ५० हजार ३९७ रुपये किमतीचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले. १३ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. कृषी विभागाच्या धाडसत्रादरम्यान प्रतिबंधित बियाण्याच्या विक्रीचा हा प्रकार उघड झाला.

कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत व धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी परिसरात काही व्यक्ती अनधिकृत कपाशी बियाण्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याआधारे रविवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून कृषी विभागाचे पथक तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा येथे पोहोचले. तेथे सतीश गणेश ठाकरे (३०) याच्याकडे प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची मागणी करण्यात आली. त्याने बियाणे आणताच त्याला ताब्यात घेण्यात आले. ते बियाणे कुठून आणले, अशी विचारणा केली असता, त्याने आरोपी प्रमोद वामन देवघरे (रा. अंजनसिंगी) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यामुळे कृषी विभागाने कुऱ्हा पोलिसांची मदत घेतली.

कुऱ्हा येथील पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी हे पथकासह अंजनसिंगी येथे पोहोचले. त्यांना प्रमोद देवघरे हा घरी नसल्याचे सांगण्यात आले. पथकाने त्याच्या घराच्या वरच्या माळ्याची झडती घेतली असता, तेथून एकूण ३९ गोण्यांमधील एकूण १८९१ कपाशी बियाणे पाकीट जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दादासो पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी उज्ज्वल आगरकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रक अनंत मस्करे, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी केली. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या कलमांन्वये गुन्हे

आरोपी सतीश ठाकरे व प्रमोद देवघरे यांच्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ४६३, ४६३,४६५, ४६८, ४७१, ३४, बियाणे नियम १९६८ च्या ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४ तथा पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या ८, १५ (१), (२), १६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.