शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

सोयाबीनचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 22:47 IST

यंदा पावसाने दडी दिल्यामुळे मूग, उदीड यासारखी कमी काळात येणारी पिके बुडाली आहेत.

ठळक मुद्देविविध रोगांचा प्रादुर्भाव : शेतकºयांच्या तोंडचा घास गेला, आर्थिक अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा पावसाने दडी दिल्यामुळे मूग, उदीड यासारखी कमी काळात येणारी पिके बुडाली आहेत. कमी वेळात येणारे सोयाबीन कसेबसे जगले पण यावरही आता संक्रांत आली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सोयाबीनची लागवड करणाºया शेतकºयांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.यंदा सुरुवातीपासून बियाण्यांचे उगवण कमी, कुठे पिकांची उंची खुंटणे, खोडअळी, फूलोºयानंतर शेंगा न धरणे यासारख्या समस्येचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे यंदा पीकविमा न काढू शकल्याने शेतकºयांवर दुहेरी संकट ओढावले आहे. हाती येणाºया पिकावर संकट आल्यामुळे शेतकºयांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. दिवाळी कशी साजरी होणार याची चिंता शेतकºयांना आतापासूनच लागली आहे.शासनाने सोयाबीन पिकाची पाहणी करावी व विनाशर्त तत्काळ मदत जाहीर करून ती लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी होत आहे.दाण्यांचा आकार, वजनही कमीतळेगाव दशासर : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सोयाबीनचे पिकास फटका बसला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव, देवगाव परिसरातील हलक्या जमिनीतील सोयाबीन कमी पावसामुळे सोकून गेले. त्यामुळे शेंगा अत्यल्प असून त्यातील दाणे बारीक होतील व त्याचे वजनही कमी होईल, याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी अशा पिकांचा विमा शासनाने देण्याची मागणी जोर धरत आहे.कपाशी, तूर या पिकांना जीवदान देण्यापुरता पाऊस झाल्याने पिकांची स्थिती सद्यस्थितीत ठीक असून काळ्या जमिनीतील सोयाबीन साधारण असून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. पाऊस कमी झाल्याने निंदण व कोळपणीच्या खर्चात थोडी बचत झाली. परंतु अद्यापही नदी-नाल्यांना एकही पूर न गेल्याने विहिरी व हँडपंपला पाणी आले नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकणार आहे, याचा फटका रबी पिकांना बसण्याची शक्यता आहे.मेळघाटात खोड अळीचा प्रादुर्भावधारणी : मेळघाटाच्या शेतातील हिरव्यागार सोयाबीन पिकांवर खोडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने हजारो हेक्टरमधील सोयाबीन पीक सुके पडून नष्ट होत आहे.सोयाबीन पिकांवर असलेली खोडअळी सोयाबीनच्या झाडावर कोणत्याही एका ठिकाणी खोडावर डंक करून त्या छिद्रात अंडी घालते. त्या अंडीमधून झाडाच्या खोडाच्या आत ती अळी असते. ती आत असलेली अळी संपूर्ण झाड नष्ट करून सोयाबीन पीक फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतातील उभे सोयाबीन पीक वाळत चालले आहे. या अळीचा मेळघाटातील सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. मेळघाटातील बहुतेक सर्व ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील शेतकºयांनी याची सूचना कृषी अधिकाºयांना दिली असून यावर आता कोणताही उपाय नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.फुले आली, शेंगा धरल्याच नाहीमंगरुळ चव्हाळा : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो एकर शेत शिवाºयातील सोयाबीन वांझोटे झालेले दिसत आहे. मंगरुळ चव्हाळा परिसरातील हरणी, वेणी, सालोड, कबी, खानापूर, निमगव्हाण अशा अनेक क्षेत्रातील सोयाबीनला शेंगाच धरलेल्या नाहीत. यावर्षी जुलै महिन्यात २० दिवसांची पावसाने दडी मारल्यामुळे शेतात सोयाबीनला फुलोरा आला. परंतु शेंगा आल्याच नाहीत.पावसानंतर काही ठिकाणी शेती लगतच्या धुºयावर शेंगा थोड्याफार दिसतात. परंतु शेताच्या मध्यस्थी भागात गेले असता एकही शेंग दिसत नाही. मंगरुळ चव्हाळा या परिसरातील गंगापूर क्षेत्रातील ईश्वर वडनेरकर यांच्या शेतात जाऊन कृषी अधिकारी ताकसांडे यांनी पाहणी केली. त्यांना पण एकही शेंग दिसली नाही. अशीच परिस्थिती मंगरुळ चव्हाळा परिसरातील अनेक शेतकºयांची आहे. या सर्व शेतकºयांच्या शेतात जाऊन पाहणी करून त्यांना तत्काळ योग्य आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.माझ्या शेतात धुºयालगतच्या सोयाबीनच्या झाडाला थोड्याफार शेंगा दिसत आहे. परंतु शेताच्या मध्यभागी काहीच शेंगा नाहीत. त्यामुळे मशागतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार, हा प्रश्नच आहे.- ईश्वर वडनेरकर, शेतकरी, मंगरुळ चव्हाळा.जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने आलेला फुलोरा जमीनदोस्त झाला. आता सोयाबीन हिरवेगार असून त्याला फुलोरा येण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेंगा येणे कठीण झाले आहे.- प्रवीण ताकसाळे,सहायक कृषी अधिकारी