शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

पंचवटी चौकात पुन्हा खासगी बसचा शिरकाव, वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून खासगी बसेसकरिता वेलकम पॉर्इंटची जागा निश्चित केली होती. नागपूर राष्ट्रीय मार्गावरील वेलकम पॉर्इंटजवळ वाहने पार्किंग करावी, कुठलीही बसेस यऊ देता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना खासगी बस मालकांना पोलिसांनी दिल्या होत्या.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त । अपघाताची भीती, खासगी बस मालकांना पोलिसांचे अभय का?

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वेलकम पॉर्इंटजवळ खासगी बसेसला थांबा व पार्किंगची व्यवस्था केली असतानाही अनेक कंपनींच्या खासगी बसेस शहरात शिरून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे पंचवटी चौकात नेहमीच वाहतुककोंडी होत असल्याने अशा बसेसमुळे नागरिकांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहेत.काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून खासगी बसेसकरिता वेलकम पॉर्इंटची जागा निश्चित केली होती. नागपूर राष्ट्रीय मार्गावरील वेलकम पॉर्इंटजवळ वाहने पार्किंग करावी, कुठलीही बसेस यऊ देता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना खासगी बस मालकांना पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र, त्याकडे लक्झरी बसेस चालक, मालकांनी दुर्लक्ष करीत राजरोसपणे पंचवटी चौकात खासगी बसेचा ठिय्या दिसून येत आहे. सकाळी व सायंकाळी तेथून प्रवाशी वाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पंचवटी चौकात पेट्रोलपंपालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नालीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तेथे येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग करतात. त्याचवेळी खासगी बसेसमध्येसुद्धा तेथून प्रवासी बसमध्ये बसविले जातात. त्यामुळे वर्दळ वाढून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दिवसातून अनेकदा येथे अशा प्रकारे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे येथे किरकोळ अपघाताच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. येथेच एसटी महामंडळाच्या बसचाही थांबा असल्याने दिवसभर शेकडो प्रवासी पंचवटी चौकात इतरत्र प्रवास करण्यासाठी याच ठिकाणावरून बसमध्ये बसतात. त्यातच खासगी बसेसचा वावर वाढल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे पोेलिसांचे व आरटीओच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. सदर खासगी बसमालक चालकांना अभय का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरात शिरणाºया खासगी बसेसना पायबंद घालावा व नियमबाह्य बसमध्ये पंचवटी चौकातूनच प्रवासी वाहतून होत असेल तर त्यांच्यावर कारवार्इंचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.रोज ५० बसेस पुण्याकरितानागपूर व अमरावतीहून पुण्याकडे जाण्याकरिता अमरावतीतून रोज २५ विविध खासगी कंपनीच्या ५० पेक्षा अधिक बसेस अमरावती येथून पुणे सुटतात. त्यामध्ये अनेक बसेस पंचवटीतून येतात. पंचवटी चौकातच सात ते आठ टिकीट बुकींग कार्यालयेसुद्धा आहेत. त्यामुळे काही प्रवाशांना पंचवटी चौकातूनच सेवा दिली जाते, हा प्रकार नियमबाह्य आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे.गर्दीच्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात असतील तर त्या बसचालकांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. टपावर माल भरून वाहतूक केली जात असेल व परमीट नसेल, तर आरटीओ कारवाई करतील.रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावतीखासगी बसेसना पंचवटी चौकात बंदी घातलेली आहे. अशा प्रकारच्या बसेस त्या ठिकाणी उभ्या राहत असतील किंवा पार्किंगमध्ये बसेस लावल्या जात असतील तर निश्चितच कारवाई केली जाईल.- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी