शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ११ शिकवणी वर्ग सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:37 IST

नोटीस बजावल्यावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार अगिनशमन यंत्रणा न उभारणारे ११ खासगी शिकवणी वर्ग बुधवारी महापालिकेच्या पथकाने सील केलेत. सहायक उपायुक्त योगेश पिठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटीस बजावल्यावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार अगिनशमन यंत्रणा न उभारणारे ११ खासगी शिकवणी वर्ग बुधवारी महापालिकेच्या पथकाने सील केलेत. सहायक उपायुक्त योगेश पिठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ती निरंतर सुरू राहणार असल्याचे उपायुक्त महेश देशमुख यांनी सांगितले.आकाश शिकवणी वर्ग, सिव्हिल इंजिनीअरिंग कॅड सेंटर, मेंटॉर, सी.ए.डी.डी. सेंटर, सी.सी.आय.टी, उडान सायन्स अ‍ॅकेडमी, राजेश येवले शिकवणी वर्ग, राठी सर शिकवणी वर्ग, भोजने सर शिकवणी वर्ग यांसह अन्य ठिकाणी नियमानुसार अग्निशमन यंत्रणा नसल्याने सील करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.सुरत येथील घटनेनंतर सहा सदस्यांची समिती स्थापन करून शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांच्या सरुक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आहेत काय, याविषयीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते. पथकाद्वारे पाहणीत फक्त १७ क्लासेसची अधिकृत नोंदणी असल्याचे आणि सर्वत्र महाराष्ट्र अग्निरोधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ च्या अनुषंगाने उपाययोजना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या खासगी शिकवणी वर्गांना महापालिकेद्वारा नोटीस बजावून सात दिवसांची व सील करण्याच्या अगोदर पुन्हा दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती.नोटीस बजावल्यानंतरही दिरंगाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच क्लासेसला सील ठोकण्यात आले. हे सील महापालिकेच्या परवानगीशिवाय उघडता येणार नाही, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी बजावले. या कारवाईमध्ये सहायक आयुक्त (मुख्यालय) योगेश पिठे, सहायक आयुक्त (बाजार व परवाना) श्रीकांत चव्हाण, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, सुनील पकडे, अग्निशमन विभागाचे कृती दलप्रमुख संतोष केंद्रे, सदस्य अमित ददगाळ, गौरव दंदे, गोविंद घुले, बाजार व परवाना विभागाचे निरीक्षक उदय चव्हाण, अमर सिरवाणी, रूपेश गोलाईत, प्रदीप झंझाळ तसेच अतिक्रमण निर्मूलन व पोलीस कर्मचारी सहभागी होते.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांसंदर्भात सर्व क्लासेसना नोटीस बजावून संधी दिली. मात्र, दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली. सुरत येथील घटनेनंतर अनेक पालकांनी या बाबीकडे लक्ष वेधले होते. - संजय निपाणे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :fireआग