शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट क्रांतीमुळे गोपनीयता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:33 IST

इंटरनेट क्रांतीतून निर्माण झालेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र अभियान : मार्गदर्शकांकडून सावधगिरीचे धडे

आॅनलाईन लोकमतअमरावती : इंटरनेट क्रांतीतून निर्माण झालेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी अभियंता भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' अभियानाला प्रारंभ झाला. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.सायबर गुन्हेगार गुन्हेगारीच्या नवनवीन पध्दती शोधून नागरिकांची फसवणुक करीत आहे. त्यामुळे नागरीकांची खासगी गोपनियतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असले तरी, त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. मात्र, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. या 'ट्रान्सफॉरमिंग महाराष्ट्र' अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जे.शेखर, अ‍ॅक्सिस बँकेचे सह उपाध्यक्ष निशिकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, एपीआय कांचन पांडे, पोलीस उपनिरीक्षक रवि राठोड यांनी सायबर गुन्ह्याविषयी मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींची 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' स्वीकारू नका, वैयक्तिक माहिती, फोटो सोशल मीडियावर प्रसारित करू नका, आॅनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास टाकू नका. आपले पाल्य इंटरनेटवर काय पाहतात, काय यावर लक्ष ठेवा, एटीएमचा वापर करताना सावध रहा. पिनकोड कोणाला दिसणार नाही, याची दक्षता घ्या, वेबसाईटवरील जाहिरातून विश्वासघात होऊ शकतो, त्याची शहानिशा करा. संचालन पीएसआय पंकज कांबळे, आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी केले. यावेळी नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.