शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तुरुंग झाले हाऊसफुल्ल! क्षमतेपेक्षा १३७ टक्के अधिक कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:51 IST

राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, हे प्रमाण तब्बल १३७ टक्के आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्दे१४१३ महिला बंदीजन ५४ कारागृहांत जागाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कप्रदीप भाकरे/अमरावती : राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, हे प्रमाण तब्बल १३७ टक्के आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारागृहांमधील बराकींची संख्या वाढविण्याबरोबर मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे नवीन कारागृह उभारणी प्रस्तावित आहे. त्या पार्श्वभूमीवर कारागृहांची कैदी सामावून घेण्याची क्षमता आणि प्रत्यक्षात असलेले कैदी यातील विषमता नव्याने अधोरेखित झाली आहे.राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत, तर वर्ग १ चे १९ , वर्ग २ चे २३ व वर्ग ३ चे ३ अशी एकूण ५४ कारागृहे आहेत. यात विशेष कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृह, खुली वसाहत, किशोर सुधारालय व कारागृह रुग्णालयांचा सामावेश आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये संख्येनुसार, राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेच्या १३७ टक्के कैदी तूर्तास आहेत. सर्व कारागृहांची अधिकृत बंदिसंख्या २३ हजार ९४२ अशी असताना, प्रत्यक्षात ३२ हजार ७८५ कैदी कारावास भोगत आहेत. यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये २२ हजार १३५ पुरुष व ६७० महिला कैदी आहेत. १९ अ-वर्ग जिल्हा कारागृहांमध्ये ५ हजार ५०२ पुरुष, तर २०७ महिला कैदी आहेत. २३ वर्ग-२ मध्ये मोडणाऱ्या जिल्हा कारागृहांमध्ये ३ हजार ५३५ पुरुष व ५२९ महिला, तर वर्ग ३ च्या तीन कारागृहांमध्ये २०० पुरुष व ३ महिला असे एकूण ३२ हजार ७८५ कैदी आहेत.महिला कैद्यांचे प्रमाणही अधिकतुरुंगातील क्षमतेपेक्षा महिला कैद्यांचे प्रमाण ११७ टक्के आहे. राज्यातील ५४ कारागृहांची महिला बंदींची क्षमता १२०१ आहे. प्रत्यक्षात १४१३ महिला कैदी आहेत. भायखळा तुरुंगात मंजुषा शेट्ये या महिला कैद्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिला कैद्यांची जादा संख्या व त्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. या १४१३ महिला बंद्यांमध्ये १०४९ न्यायाधीन, तर ३६४ सिद्धदोष कैदी आहेत.

कारागृहातील बंद्यांची संख्याबंदी प्रकार                    पुरुष              स्त्री                एकूणसिद्धदोष                      ८७७             ३६४               ८८३४न्यायाधीन                   २२८०८          १०४९            २३८५७स्थानबद्ध                        ९४                ०                  ९४

टॅग्स :Governmentसरकार