शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

By गणेश वासनिक | Updated: July 16, 2023 14:27 IST

मध्य रेल्वे मुंबई विभागात पायाभूत सुविधांमुळे ‘शून्य’ अपघात

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागातंर्गत लेव्हल लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढून टाकण्याची माेहीम युद्धस्तरावर हाती घेतली आहे. आता रस्ते उड्डाणपूल, भुयारी मार्गाच्या पूल निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधांमुळे गेल्या जून महिन्यात रेल्वे शून्य अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने जून २०२३ मध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामे हाताळली आहे. यात लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेट्स बंद करण्यात येत असल्याने अधिक चांगली वक्तशीरता राखण्यात मदत होते आणि सुरक्षितता वाढते. मध्य रेल्वेने पाच लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करून त्याजागी ओव्हर ब्रीज बांधले आहे. तर एप्रिल ते जून २०२३ या दरम्यान १२ ओव्हर ब्रीज निर्माण करून ते वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे-दौंड रेल्वे मार्ग आणि नागपूर विभागातील इटारसी-आमला

रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग फाटकांच्या जागी पुलाखाली रस्ता तयार करण्यात आला आहे. नागपूर-वर्धा विभागात लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांंक १११ व ११६ तर पुणे विभागातील पुणे-मिरज विभाग लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांंक ८१ आणि ९२ च्या जागी ओव्हर ब्रीज साकारण्यात आला आहे. बडनेरा जुनिवस्ती येथे ओव्हर ब्रीज निर्मितीचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. तर अमरावती गाेपालनगर, धामणगाव रेल्वे येथे लेव्हल क्रॉसिंग गेट्सच्या जागी ओव्हर ब्रीज मंजूर झाला असून, सर्वेक्षणाची कामे आटोपली आहेत.डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन डिवाइस उपकरणआग रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन डिवाइस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत २४ डब्यात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. १३७ पॉवर कार्सना स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम प्रदान करण्यात आले आहे. एलएचबी कोच, आयसीएफ पेंट्री कोचमध्ये ही यंत्रणा लावण्यात आली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीIndian Railwayभारतीय रेल्वे