शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत गरजांना प्राधान्य, रोजगारासाठी स्वतंत्र नियोजन - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:39 IST

कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.

अमरावती : आरोग्य, शिक्षण, रोजगार व पाणी या मूलभूत गरजांना प्राधान्य देऊन त्यानुसार वार्षिक नियोजन तयार करावे. त्यासाठी पुरेसा निधी देऊ, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजनाची बैठक वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, ना. प्रवीण पोटे, ना. डॉ.रणजीत पाटील, ना.मदन येरावार, खा.आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आ.डॉ. सुनील देशमुख, आ.डॉ. अनिल बोंडे, आ.वीरेंद्र जगताप, आ.रमेश बुंदिले, आ.प्रभुदास भिलावेकर, आ.राजेंद्र पाटणी, आ. अशोक उईके, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय, दुग्धोत्पादन, कृषिआधारित व्यवसाय आदींचा विकास व स्थानिक रोजगार निर्मितीच्या शक्यता असल्यास त्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मानव विकास योजनेत समाविष्ट गावांत अंगणवाडींचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, असे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले. 

असे आहे जिल्हानिहाय नियोजन*अमरावतीत जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव विकासासाठी १८.७५ कोटी, अंजनगाव सुर्जी येथे ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी. धामक येथील आरोग्य केंद्राला दोन कोटी रुपये.* यवतमाळ जिल्ह्यात खनिज विकास निधीतून आरोग्य, पाणी व शाळांसाठी खर्च करावा. शेतीशी संबंधित रोजगार निर्मितीवर भर, यवतमाळ येथील १०० खाटांच्या रुग्णालयासाठी पुरेसा निधी.* बुलडाणा जिल्ह्यात प्रस्तावानुसार प्राथमिक शाळांसाठी १५ कोटी, अंगणवाडी, शासकीय इमारतीसाठी ३ कोटी व महिला रुग्णालयासाठी १.५ कोटी रुपये.*वाशीम जिल्ह्यात ग्रामपंचायत भवनासाठी ७.६८ कोटी, जलयुक्तच्या इंधन खचार्साठी १० कोटी, वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी तारेचे कुंपण उभारण्यासाठी निधी वनविभागाकडून निधी. * अकोला जिल्ह्यात शेतक-यांंना अनुदान तत्वावर ट्रॅक्टरवाटपासाठी १५ कोटी, प्राथमिक शाळांसाठी ४.५कोटी, अकोल्यात कर्करोग उपचार रुग्णालय व १०० खाटांच्या रुग्णालयासाठी निधी मिळवून देण्यात येईल.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार