शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापूर्वीच भाजपच्या रीता पडोळे अविरोध खाते उघडले : बोंडेंची माघार

By admin | Updated: February 8, 2017 00:11 IST

निवडणूक रिंगणातील अन्य एका महिला उमेदवाराने माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्या आहेत.

अमरावती : निवडणूक रिंगणातील अन्य एका महिला उमेदवाराने माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्या आहेत. महापालिकेच्या २४ वर्षांच्या इतिहासात प्रत्यक्ष मतदानापूर्वी नगरसेवक बनणाऱ्या रीता पडोळे या एकमेव ठरल्यात. त्याप्रभाग क्रमांक ७ ‘ब’ ओबीसी महिलेसाठी राखीव जागेचे प्रतिनिधित्व करतील.४ फेब्रुवारीला झालेल्या नामांकन अर्जांच्या छाननीवेळीच पडोळे यांच्या अविरोध निवडीचे संकेत मिळाले होते. पडोळे यांच्याव्यतिरिक्त याजागेसाठी नामांकन दाखल करणाऱ्या सुलभा बोंडे यांनी मंगळवारी उमेदवारी परत घेतली आणि पडोळे यांचा अविरोध नगरसेविका बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला. जवाहर स्टेडियम या सातव्या क्रमांकाच्या ‘ब’ जागेसाठी पडोळे आणि बोंडे या दोघींनीच नामांकन दाखल केले होते. विशेष म्हणजे बोंडे यांनी सुद्धा भाजपचे उमेदवार म्हणूनच अर्ज दाखल केला होता. मात्र, ‘बी-फॉर्म’ पडोळे यांना देण्यात आला. मंगळवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बोंडे यांनी पक्षहित लक्षात घेत नामांकन परत घेतले. माजी महापौर मिलिंद चिमोटे, कोमल बोथरा आणि भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदींनी मतदानापूर्वीच अविरोध निवडून आलेल्या रीता पडोळे यांचे अभिनंदन केले आहे. पडोळे यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रत्यक्ष मतदानापूर्वीच विजयाचे खाते उघडले आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)