शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी आता प्राचार्यांचेही हमीपत्र, गैरप्रकार टाळण्यासाठी नवे परिपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:01 IST

आधी आॅनलाइननंतर आॅफलाइन, असा प्रवास करणा-या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आता पात्र विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह प्राचार्यांचे हमीपत्र देणेही अनिवार्य असणार आहे.

गणेश वासनिक अमरावती : आधी आॅनलाइननंतर आॅफलाइन, असा प्रवास करणा-या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आता पात्र विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह प्राचार्यांचे हमीपत्र देणेही अनिवार्य असणार आहे. याबाबत नवे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, २०१७-२०१८ हे शैक्षणिक वर्ष संपायला उणेपुरे २ महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा छदामही मिळालेला नाही.विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने ९ जानेवारी २०१८ रोजी शासन परिपत्रक जारी करून केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आदी योजनांचे निकष ठरविले आहे. शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून आॅनलाइन अर्ज मागविले. तांत्रिक त्रुटी असल्याने आॅनलाइन शिष्यवृत्तीचा बोजवारा उडाला. त्यामुळे २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाहीकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व निर्वाह भत्त्याची अनुज्ञेय रक्कम वितरित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. नव्या शासन परिपत्रकात शिष्यवृत्तीसाठी प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. त्यात एका हमीपत्रावर विद्यार्थी, पालकांची स्वाक्षरी, तर दुसºया हमीपत्रावर प्राचार्यांची स्वाक्षरी, महाविद्यालयाचा शिक्का आवश्यक आहे.दोषी संस्थांना शिष्यवृत्ती नाही-घोटाळ्यातील दोषी संस्था व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देता येत नाही, असे विशेष चौकशी पथकाने शिष्यवृत्ती यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा संस्था, अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचे वाटप करू नये, ही बाब नव्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आली आहे.नव्या परिपत्रकात वर्षाचा घोळ झाल्याची बाब निदर्शनास आली. ९ जानेवारी २०१८ ऐवजी २०१७ असा उल्लेख असल्याने हे परिपत्रक किती सत्य आहे, याविषयी समाजकल्याण अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी