शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

डाळींचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:30 IST

तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात ...

उडीद डाळीला सर्वाधिक भाव : तूर डाळही पोहोचली १५० रुपयांवर अमरावती : तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात कमी येऊन घटलेली आवक यामुळे पुन्हा बाजारात सर्वच प्रकारच्या डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन आठवड्यांत डाळीमध्ये २० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळींची पुन्हा साठमारी होण्याची शक्यता असून सरकारने डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे. मागील वर्षी आजवरची विक्री दरवाढ तुरीच्या डाळीत झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून तूरडाळ हद्दपार झाली होती. यामध्ये सरकारही हवालदिल झाले होते. यावर उपाय म्हणून सरकारने पुरवठा विभागाद्वारा धाडसत्र राबविले व डाळींचे भाव काहीसे कमी झाले. यामध्ये चार महिन्यांचा दिलासा मिळत नाही. तोच पुन्हा डाळींच्या भावात वाढ होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पाऊस कमी, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३० टक्क्यांनी कमी आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव व शेंग पोखरणारी अळी व मळणीच्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे कडधान्याचे उत्पादन घटले. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने मिळेल त्या भावात तुरीची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ भाववाढ होत असताना माल विक्रीसाठी नाही याचा फायदा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे यांच्यात काही दिवसांत डाळीची मोठ्या प्रमाणात भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)दोन आठवड्यात भाववाढसध्या वर्षभऱ्याचे धान्य व डाळ खरेदीचा हंगाम व लग्नसराई आहे. त्यात दाळीची आवक घटल्याने डाळीचे भाव कडाडत आहे. १५ ते २० दिवसात पुन्हा डाळीमध्ये तेजी येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सुत्रांनी सांगितले. दोन आठवड्यापूर्वी १२० रुपये असणारी तुरदाळ आता १५० रुपयांवर आली आहे. तर उडिद दाळीची स्थिती सर्वात गंभीर आहे. १३० ते १४० रुपये असणारी उडिद दाळ १८० रुपये मूगदाळ ८५ ते ९५ रुपयांवर १०० रुपये, हरभरा दाळ ५५ त ६० रुपयांवरुन ७५ ते ८० रुपये झालेली आहे. ज्या दाळीला मागणी नाही त्या मसुर दाळीमध्ये १५ ते २० रुपयांची वाढ होऊन ती ५५ ते ६० रुपयांवरुन ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. तुकडा तुरदाळीची मागणी वाढलीतुरदाळीची मागणी वाढत असल्याने अनेक जन तुकडा तुरदाळीला प्राधान्य देत आहे व त्यालाही चांगली मागणी आहे. सद्यस्थितीत ही तुकडा तूरदाळ ११० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहे.