शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय बाजारपेठेत विदर्भाच्या संत्र्याला मातीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 13:26 IST

Amravati News Orange यावर्षी आंबिया बहराच्या संत्र्याचे उत्पादन चांगले असले तरी मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे४० टक्के शेतमाल शेतातच१० ते १५ रुपये किलोचा दर

संजय खासबागेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याची ख्याती आहे. येथील संत्र्याची देश-विदेशात चव चाखली जाते. तालुक्यात २० हजार हेक्टरवर हे पीक घेतले जाते. यावर्षी आंबिया बहराच्या संत्र्याचे उत्पादन चांगले असले तरी मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. संत्र्याला २५० ते ५०० रुपये क्रेट व केवळ १० ते १५ रुपये किलोनुसार दर मिळत असल्याने उत्पादनखर्च काढणे दुरापास्त झाले आहे. यामुळे संत्राउत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले असून, ४० टक्के संत्री झाडावरच आहेत.संत्र्याचा अंबिया बहर आणि मृग बहर घेतला जातो. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये वातावरण चांगले असल्याने अंबिया बहराची फूट समाधानकारक राहिली. मात्र, येथील अंबिया बहराच्या संत्र्यावर पंजाबच्या किन्नूने मात केली. बाजारपेठेत स्थानिक संत्र्याला भाव मिळत नाही. दिल्ली, झारखंड, उत्तरप्रदेश, केरळमध्ये संत्र्याचे भाव पडल्याची ओरड आहे. वैदर्भीय संत्र्याला परप्रांतीय बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत आहे. आंदोलने, कोरोना प्रादुभार्वाचा फटकादेखील बसला आहे. बांग्लादेशातसुद्धा संत्र्याची परवड होत आहे.वैदर्भीय संत्री २५० ते ५५० रुपये क्रेटने विकला जातो. यामध्ये तोडाई , भराई, मालवाहतूक असा बाजारपेठेपर्यंतचा खर्च २५० रुपयांच्या आसपास जातो. त्यामुळे उत्पादन व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने संत्राउत्पादक मेटाकुटीस आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याची वेळ असते. मात्र, अद्यापही संत्री झाडावरच असल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांनासुद्धा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे परप्रांतीय बाजारपेठेत महाराष्ट्र पणन महामंडळाचे कार्यालय उघडणे आवश्यक आहे. संत्र्याचे भाव कोलमडल्याने संत्राउत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट मार्केटिंगची सुविधा होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.अंबिया बहराचे उत्पादन घेण्याकरिता नोव्हेंबरमध्ये पाणी सोडावे लागते. मात्र, संत्री झाडावरच असल्याने पाणी सोडता येत नाही. यामुळे संत्राउत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.- विजय श्रीराव, संत्राउत्पादक, पुसला

टॅग्स :agricultureशेती