शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

खतांची किंमत एक टक्क्याने घसरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:02 IST

एक जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने रासायनिक खतांच्या किमती एक टक्याने कमी झाल्या आहेत.

जीएसटीचा परिणाम : कृषी विभागाकडून सुधारित दर लागूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने रासायनिक खतांच्या किमती एक टक्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने सुधारित दर जाहीर केले आहेत. याबाबत खतविक्रेत्यांना सूचित करण्यात आले आहे. सुधारित दरपत्रक दरफलकावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर होत असतो. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने खतांची मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री होत आहे. जीएसटी करप्रणाली लागू होण्यापूर्वी राायनिक खतांवर १ टक्के उत्पादन शुल्क व ५ टक्के मूल्याधारित कर (व्हॅट) लागू केला होता. १ जुलैपासून सरसकट ५ टक्के जीएसटी (गड्स अँड सर्व्हिस टॅक्स) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानित रासायनिक खतांच्या किमतीत १ टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. एक हजाराच्या खताच्या एका गोणीमागे सरासरी १० रूपये कमी आकारले जातील. खतांमध्ये १०-२६-२६ च्या ५० किलोच्या एका गोणीसाठी एक हजार ५५ ते एक हजार ७४ असे कंपनीनुसार दर असतील. १२-३२-१६ या खताची ५० किलोची गोणी १ हजार ८२ रूपयांना मिळणार आहे. १५-१५-१५ ची गोणी ८८७, १६-१६ ची गोणी ८९२, १७-१७-१७-१७ ची गोणी ९४६, २४-२४-० ची गोणी ९६६, एमओपीची बॅग कंपनीनुसार ५७५ ते ५८०, एसएसपीची गोणी ४००, डीएपीची एक गोणी कंपनीनुसार १ हजार ७६ ते १ हजार १०५ च्या दरम्यान मिळणार आहे. युरियाच्या एक गोणीचा दर ७०० रूपयांना मिळेल. जिल्ह्यातील विविध खतविक्रीच्या दुकानांमध्ये पीओएस मशिनव्दारे खतांची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतखरेदी करताना आधारकार्डची प्रत सोबत ठेवावी लागेल. पीओएस मशिनव्दारे खते खरेदी करताना त्याचे बिल पीओएस मशिनव्दारे मिळणार आहे. विक्रेत्यांना पीओएस मशिनव्दारेच खतविक्रीचे बंधन घालून देण्यात आहे. खतविक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या खतांच्या किमती दर्शनी भागात प्रदर्शित कराव्यात. खरीप हंगामात विनातक्रार व वेळच्या वेळी शेतकऱ्यांना खतपुरवठा करावा. - उदय काथोडे, कृषीविकास अधिकारी