शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीला मुलीसह बाहेर काढून दुसरीशी घरठाव; सहा महिलांसह दहा जणांविरूद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: April 3, 2023 17:39 IST

मुलगी झाल्याने घटस्फोटासाठी दबाव

अमरावती : पत्नीला मुलीसह घराबाहेर हाकलून देत पतीने दुसऱ्याच महिलेला घरी आणल्याची तक्रार एका विवाहितेने बडनेरा पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी २ एप्रिल रोजी सायंकाळी विवाहितेचा पती मंगेश मधुकर ढोके (३२, रा. येवदा), वासुदेव श्रीराम खडे (५०), साहेबराव वासुदेव खडे(३५), राजेश वासुदेव खडे (३२, तिघेही रा. रामतिर्थ) व सहा महिलांविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

आरोपी मंगेशचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत, त्या महिलेविरूदध देखील गुन्हा नोंदविला गेला आहे. फिर्यादी महिलेचे मंगेश ढोके याच्यासोबत सन २०१५ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. ती सासरी राहण्यास गेली. काही दिवसांनी पतीसह सासरच्या चार महिलांनी तिला त्रास देणे सुरू केले. ते नेहमी तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होते. दरम्यान, सन २०१६ मध्ये तिला मुलगी झाली. या कारणावरून पतीसह त्या चारही महिलांनी तिला मारहाण करून घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला. आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवा होता, म्हणून तिचा अनन्वित छळ करण्यात आला.‘ती’ देखील आधीच विवाहित

दरम्यान आरोपी पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध जुळले. त्यानंतर पती व सासरच्या चार महिलांनी तिला तिच्या मुलीसह येवदा येथील घरातून बाहेर हाकलून दिले. त्यानंतर आरोपी मंगेश हा त्या दुसऱ्या महिलेसोबत एकत्र राहू लागला. आता त्या दाम्यत्याला एक मुलगा देखील झाल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे ती महिला आधीच विवाहित असून तिने तिच्या पतीपासून घटस्फोट दिलेला नाही. तरी देखील ती आपल्या पतीसोबत राहत असल्याचे विवाहितेने म्हटले आहे. दरम्यान ती पतीला समजाविण्याकरिता गेली असता आरोपींनी तिला घराबाहेर काढून दिले व तिला शिवीगाळ करून धमक्या दिल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDomestic Violenceघरगुती हिंसाAmravatiअमरावती