शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात कर्मचारी बदली रद्द करण्यासाठी दबावतंत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

बदल्यांमुळे कामकाज ठप्प पडणार, असा अदृश्य मेसेज विद्यापीठात पसरविण्यात आला. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचे कोणीच वाली नाही, अशांनी कुलसचिवांचे बदली आदेश ‘सर आंखों पर’ असे मानत बदली झालेल्या जागी रुजू होऊन कर्तव्य बजावणे सुरू केले. तथापि, ज्या कर्मचाऱ्याच्या अंगी पुढारीपण ठासून भरले आहे, अशांनी मात्र राजकारणाचा आधार घेत मिळालेले बदली आदेश रद्द करण्याची मोहीम फत्ते केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत १० ते १५ वर्षांपासून एकाच टेबलवर चिकटून बसलेल्या ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या २७ जानेवारी रोजीच्या आदेशान्वये कुलसचिवांनी केल्या आहेत. मात्र, मलईदार टेबल हातून जाता कामा नये, यासाठी कुलसचिवांवर बदली आदेश रद्द करण्यासाठी दबावतंत्र आणले गेले. परिणामी सोमवारी एका लिपिकाच्या दबावापुढे विद्यापीठ प्रशासन झुकले आणि बदली आदेश स्थगित केला. विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारात आपपरभाव दिसून येत आहे.कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी एकाच वेळी ८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. मात्र, बजेटपूर्वी कर्मचाऱ्यांच्या बदल्या योग्य नाहीत, असा अफलातून सूर आळवण्यात आला. बदल्यांमुळे कामकाज ठप्प पडणार, असा अदृश्य मेसेज विद्यापीठात पसरविण्यात आला. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचे कोणीच वाली नाही, अशांनी कुलसचिवांचे बदली आदेश ‘सर आंखों पर’ असे मानत बदली झालेल्या जागी रुजू होऊन कर्तव्य बजावणे सुरू केले. तथापि, ज्या कर्मचाऱ्याच्या अंगी पुढारीपण ठासून भरले आहे, अशांनी मात्र राजकारणाचा आधार घेत मिळालेले बदली आदेश रद्द करण्याची मोहीम फत्ते केली आहे. प्रशासन ‘बॅकफूट’वर आले, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली, हे विशेष.

महाविद्यालयीन विभागात आहे तरी काय?विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विभागातून बदली होऊ नये, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांना का वाटते, हा तर खरा संशोधक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे संशोधनाचा विषय आहे. कुलसचिवांवर राजकीय दवाब आणून साेमवारी परीक्षा विभागात झालेले बदली आदेश तात्पुरते स्थगित करून महाविद्यालयीन विभागातच ती कायम ठेवली, असा नवा आदेश काढून घेतला. त्यामुळे महाविद्यालयीन विभागात किती मलईदार टेबल आहेत, या विषयावर पीएच.डी. केल्यास या विभागातील वास्तव समोर येईल. सोमवारी दोन अधिकारी, एका कर्मचाऱ्याचा बदली आदेश स्थगित करण्यात आला.

 

टॅग्स :universityविद्यापीठTransferबदली