लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषदेत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार राजकीय क्षेत्रात या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे.राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असून, अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीसाठी मागील काही दिवसांत पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पार पडल्या. राज्यात २५ हून अधिक जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे बोलले जात आहे. अमरावती जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग यापूर्वी झाला आहे. तोच प्रयोग यावेळी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याप्रमाणे जिल्हा परिषदेतील महाआघाडी यावेळीही राहणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी समाप्त झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांची मुदतवाढ शासनाने दिली होती. ती मुदतवाढ आता २० जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी येत्या ६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे नवीन शिलेदार ठरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे. पुढील कालावधीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत. त्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने पुढील कार्यकाळाची सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी लागणाºया बहुमताची मॅजिक फिगर महाविकास आघाडीकडे असल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही सत्तास्थापनेसाठी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. सत्ताधारी काँग्रेसचे घटक पक्षाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये कोण यशस्वी होणार, हे येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे.राजकीय पक्षांचे नेते लागले कामालाजिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी काँग्रेसचे नेते सध्या यासाठी जोरदार लॉबिंग करताहेत. घटक पक्षाचे नेते मंडळीसोबत वारंवार चर्चा करून वाटाघाटी केल्या जात आहेत. दुसरीकडे विरोधकही सत्तास्थापनेसाठी रणनीती आखून मित्रपक्षांची तडजोड करण्याच्या हालचाली करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची संधी नेमकी कुणाला दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शुक्रवारपासून उलथापालथजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक ६ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ता समीकरणाची व्यूहरचना ठरविण्यासाठी जिल्हा परिषदेतील नेते मंडळी कामाला लागली आहेत. मात्र, खºयाअर्थाने जिल्हा परिषदेच्या राजकीय उलथापालथ शुक्रवार, ३ जानेवारीपासून जोर धरणार आहे. त्यासाठी छुप्या पद्धतीने घडामोडी घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असून, अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीसाठी मागील काही दिवसांत पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पार पडल्या. राज्यात २५ हून अधिक जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे बोलले जात आहे. अमरावती जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग यापूर्वी झाला आहे. तोच प्रयोग यावेळी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याप्रमाणे जिल्हा परिषदेतील महाआघाडी यावेळीही राहणार आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सत्तास्थापनेच्या हालचाली, विरोधकही सरसावले