शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची पूर्वतयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 17:48 IST

राज्यातील आठ हजार ४३९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक या महिन्याच्या शेवटी जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित जिल्हा निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरू आहे.

अमरावती, दि. 19 - राज्यातील आठ हजार ४३९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक या महिन्याच्या शेवटी जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित जिल्हा निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी व्हीसीद्वारे तयारीचा आढावा घेतला. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व महिला उमेदवारांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्याने अधिकाधिक महिलांचा सहभाग राहावा, यासाठी जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. 

ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणा-या ८,४३९ ग्रामपंचायतींची निवडणूक या महिन्याच्या अखेरीस जाहीर होऊन सप्टेंबर महिन्यात मतदान होणार आहे. त्यानुसार निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. प्रभाग पद्धतीच्या या निवडणुकीमध्ये प्रथमच जनतेमधून थेट सरपंचाची निवड होत असल्याने प्रत्येक मतदारास ३ किंवा ४ मते द्यावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची तसेच संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची निश्चिती करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. 

मतदान केंद्रावर सुव्यवस्थित खोल्या, शौचालय, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, रॅम्प, सुरक्षा भिंत याची खातरजमा करण्याचे निर्देशित केले आहे. यावेळी अधिक मते द्यावयाची असल्याने आवश्यकतेनुसार ईव्हीएम व स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत करावयाच्या मतदानाबाबत, उमेदवारी अर्ज व घोषणापत्रे संगणकीय पद्धतीने भरण्याबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र, आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रती व जातवैधता प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र सादर करावे लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच 'व्होटर स्लिप'लोकसभा व विधानसभा निवणुकीप्रमाणेच या निवडणुकीतदेखील मतदारांचे छायाचित्र असलेल्या 'व्होटर स्लिप'चे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी संगणकीकृत मतदार यादी तयार करताना व्होटर स्लिप तयार कराव्यात व मतदानाच्या तारखेपूर्वी वाटप होईल याची खबरदारी जिल्हाधिकाºयांनी घ्यावी, असे आयोगाने सूचित केले आहे.जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास हमीपत्र ग्राह्यराखीव प्रभागातून निवडणूक लढविणा-या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, हे उपलब्ध नसल्यास जातवैधता समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाची मुभा देण्यात आली आहे. मात्र अशा उमेदवारांना निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.