शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

काकरमल येथील गर्भवती महिला विहिरीत कोसळली; बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणेचे रूग्णवाहिकासह धाव

By जितेंद्र दखने | Updated: December 27, 2022 21:40 IST

काकरमल येथील गर्भवती महिला ही विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर रूग्णालयात सुरूवातीस येण्यास तयार नव्हती.

अमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्यांतर्गत येत असलेल्या काकरमल येथील सुमित्रा कास्देकर ही २४ वर्षीय गर्भवती महिला पाणी काढण्यासाठी गावातील विहीर गेली असता तोल जाऊन कोसळल्याची घटना २७ डिसेंबर रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूग्णावाहिकेसह घटनास्थळ गाठले व गर्भवती महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.

सुमित्रा ही ७ महिन्याची गर्भवती असल्याने खबरदारीच्या दृष्टीने तिला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका घेऊन गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना महिलेला बाहेर काढल्यानंतर संबंधित महिला रूग्णालयात उपचारासाठी तयार होत नव्हती. त्यामुळे तिला समजाविण्याचा बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर सुमित्रा उपचारासाठी रूग्णालयात येण्यास तयार झाली. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने सुमित्राला धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुमित्राला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र गर्भवती असल्याने तिची प्रकृती खबरदारीसाठी तपासण्यासाठी रूग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.काकरमल येथील गर्भवती महिला ही विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर रूग्णालयात सुरूवातीस येण्यास तयार नव्हती. आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी व ग्रामस्थांनी सुमित्राची समजूत काढल्यानंतर ती रूग्णालयात येण्यास तयार झाली. तिला धारणी येथील रूग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांकडून तिची आरोग्य तपासणी केली जात आहे. तिच्या प्रकृतीवर आरोग्य विभागातील डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.डॉ. सुभाष ढाेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाAmravatiअमरावती