तयारीला वेग : प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू अमरावती : विधीमंडळाची पंचायत राज समिती येत्या २७ ते २९ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद , पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा, व ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भेटी देणार आहे. २५ आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचा नियोजित दौरा जिल्हा परिषदेत धडकला आहे. त्यामुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पंचायती राज समितीच्या सदस्यांचे २७ षॉक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विधानमंडळ सदस्यांशी चर्चा केली जाणार आहे.त्यांतर याच ठिकाणी जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्याशी अनऔपचारीक चर्चा पिआरसीचे पदाधिकारी व सदस्य करणार आहेत. सकाळी ११ वाजता सन २००८ -२००९ आणि २०११-१०१२ च्या लेखा परिक्षा परिक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या स्ांबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी २८ आॅक्टोंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यांतर सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील पंचायत समिती ,प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा, व ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र आदीना भेटी देऊन संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची साक्ष घेतली जाणार आहे.गुरूवार २९ आॅक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सन २०१२-२०१३ या वर्षाच्या वार्षीक प्रशासन अहवाला संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे.या प्रमाणे विधान मंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा सध्या निश्चित करणयत आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती आदी ठिकाणी प्रशासकीय कामकाज अपडेट ठेवण्याची कारवाई सुरू असून यामध्ये कुठल्याही त्रुटी राहू नये याची दक्षता मात्र अधिकारी व कर्मचारी बारकाईने घेत आहेत. सर्व कर्मचारी कार्यालयात वेळीच हजर राहात असल्याचे दिसत आहे.
पीआरसीचा नियोजित दौरा धडकला
By admin | Updated: October 8, 2015 00:14 IST