शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वृध्दाने आरएमओ कक्षासमोरच सोडले प्राण

By admin | Updated: December 23, 2015 00:10 IST

गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘आरएमओ’ यांच्या कक्षासमोरच सोमवारी रात्री एका अनोळखी वृध्दाने प्राण सोडले.

अमरावती : गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘आरएमओ’ यांच्या कक्षासमोरच सोमवारी रात्री एका अनोळखी वृध्दाने प्राण सोडले. त्यामुळे अशा निराधारांना आरोग्य सेवा पुरविणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निराधारांसाठी महापालिकेमार्फत निवासाची सोय करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी वृध्द, महिला भटकंती करताना आढळून येतात. उदरनिर्वाहासाठी त्यांना भीक मागावी लागते. अलीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय गोरगरीब निराधारांचे आश्रयस्थान बनले आहे. इर्विन चौक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आवारात दररोज चार ते पाच वृध्द पाय पोटाशी घेऊन पडून असतात. त्यांची चौकशी करण्याची व त्यांना मदत देण्याची गरज आणि सवड कोणालाच नसते. या परिसरातून ये-जा करणारे लोक जे काही पैसे देतात त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतोे. मात्र, या निराधार, बेघरांना आरोग्याची सुविधा पुरविण्याची गरज असताना ती पुरविणार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अशाच प्रकार सोमवारी मध्यरात्री इर्विनमध्ये घडला. जिल्हा सामन्य रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (आरएमओ) कक्षासमोर दोन दिवसांपासून एक अनोळखी वृध्द झोपून होता. तो तिथे कसा आणि केव्हा आला? हे कुणालाच ठाऊक नव्हते. तेथील काही कर्मचाऱ्यांनी त्या वयोवृध्दासाठी जेवणाची सोय करून दिली. त्यामुळे त्याने रात्रभर कसाबसा तग धरला. मात्र, मंगळवारी सकाळी त्या वयोवृध्दाने प्राण सोडले. जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक गोरगरीब, गरजुंना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र, ज्यांचा कुणीच वाली नाही. त्यांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रूग्णालयात कुणीही स्वीकारत नाही, हे या घटनेवरून दिसून आले. रुग्णालयाची अनास्थाअमरावती : वेळ असतानाच त्या वयोवृध्दाला उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. मात्र, तो कोण?, कुठला, त्याचे नाव, गाव, पत्ता माहित नसल्याने इर्विनच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही. आरएमओच्या कक्षासमोरच त्याने प्राण सोडले. रुग्णालयाबाहेर गंभीर अवस्थेत उपचाराच्या प्रतीक्षेत पहुडलेल्या निराधारांच्या उपचारांची सोय करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)