शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ गुन्हे असलेला प्रशांत वर्षभरासाठी कारागृहात; एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध

By प्रदीप भाकरे | Updated: March 20, 2024 19:46 IST

पोलीस आयुक्तांची कारवाई

अमरावती: बेलपुरा येथील कुख्यात गुन्हेगार प्रशांत उर्फ सोनु लक्ष्मण चावरे (२६) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. १९ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरूध्द फौजदारी स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.             

आरोपी प्रशांत चावरे हा सन २०१८ पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याच्याविरुध्द राजापेठ व बडनेरा पोलीस ठाण्यात संगनमताने दुखापत करणे, गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने हल्ला, अश्लिल शिवीगाळ करून मारण्याची धमकी, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणुक, दंगा करणे, अश्लिल शिवीगाळ, आरोपीस आश्रय देणे, विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, जबरी चोरी, कट रचून जिवे मारण्याचा उद्देशाने अपहरण करून हत्या व पुरावा नाहीसा करणे, असे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहे. तडीपार कारवाई करून देखील तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय असल्याने त्याच्याविरूध्द एमपीडीए करण्यात यावा, असा प्रस्ताव राजापेठ ठाण्याकडून पाठविण्यात आला होता. स्थानबध्दतेच्या प्रस्तावाची एसीपी शिवाजीराव बचाटे व गु्न्हे शाखा प्रमुख राहुल आठवले यांनी पुर्तता केली. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्तांनी १९ मार्च रोजी आदेश पारीत केले. त्याला गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेऊन राजापेठ पोलीस ठाण्यात हजर केले. तेथून त्याला स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी