शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

प्रशांत देशपांडे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष

By admin | Updated: April 2, 2017 00:07 IST

जिल्हा वकील संघाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यामध्ये प्रशांत देशपांडे हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विजयी झालेत.

जिल्हा वकील संघ निवडणूक : चंदन शर्मा उपाध्यक्ष, आनंद पुरोहित सचिवअमरावती : जिल्हा वकील संघाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यामध्ये प्रशांत देशपांडे हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विजयी झालेत. त्यांना ४७३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महेंद्र तायडे यांना ३४६ मते मिळाली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. यात प्रशांत देशपांडे यांना सर्वाधिक मते मिळाली. या पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार विवेक बारलिंगे यांना ८६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी चंदन शर्मा विजयी झालेत. त्यांना ४७४ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर गजानन आकोलकर यांना ३८५ मते मिळाली. सचिवपदासाठी प्रतीक पाटील विजयी झालेत. त्यांना ५३२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अतुल भेरडे यांना २८२ मते मिळाली. दिनेश शर्मा यांना ८६ मते मिळाली. ग्रंथालय सचिवपदासाठी आनंद पुरोहित यांना ४१२ मते मिळाल्याने ते विजयी ठरले. सुरेंद्र गावंडे यांना २७४ व भारती येवले यांना १९८ मते मिळाली. तर सदस्यांमध्ये अभिषेक निस्ताने-६३१, मोहन मोरे- ६०६, तृप्ती रावत- ६०३, सोनाली फुसे ५९०, धीरज रानोटकर- ५८९, रमेश माळी- ५५९, प्रशांत कडूकर- ५४२ यांना सर्वाधिक मते मिळाल्याने ते विजयी झालेत. तालीब खान यांना ४७४, अमर नंदेश्वर यांना ३८० व शोभा मिश्रा यांना ३३३ मते मिळाली असून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. (प्रतिनिधी)