अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील धनेगाव येथील प्रमोद गोविंदराव येवले यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. अंजनगाव सुर्जी येथील नप प्राथमिक शाळेतून प्रमोद येवले यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. तर विद्यालयीन शिक्षण येथीलच सीताबाई संगई विद्यालयात झाले आहे. यांनी औषधी निर्माण शास्त्र विषयात आचार्य पदवी मिळविली आहे. विद्यापीठातील विविध प्राधिकरणावर काम करण्याचा २० वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अंजनगाव तालुक्यातील या सुपूत्राने नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरूपद प्राप्त केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
अंजनगावचे प्रमोद येवले नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू
By admin | Updated: July 16, 2015 00:32 IST