शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गेली कोमात

By admin | Updated: May 31, 2015 00:02 IST

केंद्र शासनाने सन २००१ मध्ये ग्रामीण भागातील खेडे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक ....

कामे ठप्प : सात महिन्यांपासून निधीही बंदअमरावती: केंद्र शासनाने सन २००१ मध्ये ग्रामीण भागातील खेडे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मोठा गाजावाजा करून अंमलात आली. मात्र नोव्हेबर २०१४ पासून या योजनेस केंद्र शासनाने निधी देण्यास नकार दिल्याने ही योजनाच आता पुर्णत: कोमात गेल्याचे चित्र आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू झाली. या योजनेच्या पहिल्या टप्यात ५०० लोकसंख्येवरील मुख्य रस्त्याला न जोडलेली गावे जोडणे, त्यापाठोपाठ ५०० ते १००० हजार लोकसंख्या असलेले गाव मजबूत रस्त्याने जोडणे असा कार्यक्रम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत राबविण्यात आला. या उपक्रमाने अनेक अविकसीत असलेली गावे ही मुख्य रस्त्याला जोडण्यात आली.यासाठी केंद्र शासनाने मोठया प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला होता. साधारणपणे या उपक्रमामुळे सन २००५ ते २००६ पर्यत राज्यातील खेडी जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत टप्प्या क्र २ मध्ये रस्ते सुधारणा करण्याची प्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून राबविली यामध्ये रस्त्याची कामेही समाधनकारक करण्यात आली. सन २०१० मध्ये या योजनेत करण्यात आलेल्या रस्त्यावरील पुलाच्या निमिर्तीचे कामे हाती घेण्यात आले. ही योजना नोव्हेबर २०१४ पर्यत व्यवस्थित सुरू होती. आता केंद्रात भाजपाचे सरकार येताच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला निधी देणेच बंद केला आहे. अशातच अमरावती सह राज्यभरात सुरू असलेल्या योजनेतील कामे अर्धवट स्थितीत अडकून पडली आहेत.परिणामी काम करणारी यंत्रणाही संकटात सापडली आहे.अशातच कंत्राटदारांची सुरक्षा अमानतीचे जिल्ह्यात ८८ लाख रूपये सुध्दा जमा आहेत या योजनेतील केंद्र शासनाने मागील वर्षी नोव्हेबर पर्यत दिलेला शासन निधीही परत घेतल्याची माहिती आहे. केंद्र शासनाने सदर योजनेसाठी निधी देणे बंद केल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आता गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अशातच केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ३ हजार कोटीची कामे सुरू केलेली आहेत व या कामासाठी २९८ कोटी रूपये निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे एवढया कमी निधीमध्ये योजनेतील कामे कशी होतील असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.परिणामी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या प्रकारामुळे चांगलीच अडचणीत आली आहे.(प्रतिनिधी)प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत रस्त्याने न जुडलेली गावे या योजनेच्या माध्यमातून जोडल्या गेलीत शिवाय सध्याही जोडण्याचे काम सुरू आहे. मागील नोव्हेबर महिन्यापासून योजनेस केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या व मंजुर कामांना शासनाने निधी द्यावा-गिरीश कराळे सभापती बांधकाम समिती जि.प