जिल्हाधिकारी दालनासमोरील घटना : रतन इंडियाविरूध्द भूमिहीन बेरोजगारअमरावती : रतन इंडिया कंपनीसाठी २५ वर्षांपूर्वी १२ एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली. सरकार बदलले; पण मुलांना नोकरी देण्याचे अश्वासन अपूर्णच आहे. जगायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर कुणीच देत नाही. हक्कासाठी संघर्ष करून हताश झालेल्या ७५ वर्षीय प्रकल्पग्रस्त भूमिहीन शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय हादरले. कंपनीविरुद्ध चिडलेल्या शेकडो प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्र्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. घटना स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली. मोठा पोलीस ताफा जिल्हाधिकारी परिसरात तैनात करण्यात आला होता. रामकृष्ण साजेराव पारवे (रा. माहुली) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या वृद्धाला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. वाघोली, डवरगाव, माहुली, डिगरगव्हाण परिसरातील २८०० एकर जमीन तत्कालीन ‘सोफिया’ या पॉवर प्रोजेक्टसाठी २५ वर्षांपूर्वी प्रशासनाने अधिग्रहित केली आहे.
प्रकल्पग्रस्त वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: August 15, 2015 00:39 IST