शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

‘बिजली-रॉकेट’ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:10 IST

येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्या ४० वर्षांपासून आयोजित केला जात आहे.

ठळक मुद्दे‘शिवाजी’चा पोळा उत्सव : बैलजोडीसह मालकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्या ४० वर्षांपासून आयोजित केला जात आहे.रूरल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात थाटात पार पडलेल्या पोळा उत्सवाच्या अध्यक्षस्थानी दिलीप इंगोले, तर विशेष पाहुणे म्हणून खा. आनंदराव अडसूळ होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नंदकिशोर चिखले, प्रमोद देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, राजेश वानखडे, शशांक देशमुख, गौरव सोनी, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, विलास काळे आदी उपस्थित होते. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते पोळा उत्सवात सहभागी होणाऱ्या बैलजोडी मालकांचा दुपट्टा, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पोळा उत्सवात दिवसेंदिवस बैलांची संख्या रोडावत असल्याबाबत आयोजकांनी चिंता व्यक्त केली. बैलजोडी सजावट स्पर्धेचे परीक्षण एन.डी. राऊत, अ‍े.ओ, खंडारे, प्रमोद गावंडे, विलास काळे, धनजंय मोहोड आदींनी केले. यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्थानिक कोणार्क कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने पटकाविला. शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख ९५०० रूपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. दुसरा क्रमांक नवसारी येथील रामराव वानखडे यांच्या बैलजोडीला शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख ५५०० रूपये, तर तिसºया क्रमांकाचे बक्षीस नितीन ठाकरे यांच्या बैलाजोडीला शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख ३६०० रूपये देण्यात आले. चवथा क्रमांक येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या बैलजोडीला शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख १००१ रूपये देण्यात आला. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस जनता कृषितंत्र विद्यालयाच्या बैलजोडीने पटकावले. शिल्ड, अहेर, बैलाचा साज आणि रोख ५०१ रूपये बहाल करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन मुकेश देशमुख यांनी केले.