शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७७ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त; सहायक वनसंरक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

By गणेश वासनिक | Updated: July 6, 2023 19:12 IST

गडचिरोली नक्षलग्रस्त भागातही २० डीएफओंच्या पदांचा वानवा

अमरावती: राज्याच्या वन विभागात वर्षभरापासून ७७ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकुणच कामकाजावरपरिणाम होत आहे. तर दुसरीकडे सहायक वनसंरक्षकांना पदोन्नती दिली जात नसल्यामुळे वन प्रशासणनाचे वेळकाढू धाेरण पुढे आले आहे.

वन विभागात विभागीय वनाधिकारी (डीएफओ) ही पदे वर्ग १ ची आहेत. ही पदे सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग,मूल्यांकन, शिक्षण, संरक्षण अशा वेगवेगळ्या विभागाची धुरा सांभाळतात. गत वर्षभरापासून सामाजिक वनीकरणात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३५ पदे रिक्त आहेत. प्रादेशिक विभागात संरक्षणाबाबत तीन वृत्तस्तरावर १५ पदे रिक्त आहेत. याशिवाय मूल्यांकन, शिक्षण या ठिकाणी पदे रिक्त ठेवण्यात आल्याने डीएफओ पदांचा मोठा बॅकलॉग आहे. एककिकडे विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त ठेवायची आणि सहायक वनसंरक्षकांना कारभार सोपवायचा असा प्रकार अलीकडे वन विभागात सुरू आहे.वनवृत्त स्तरावर डीएफओंची रिक्त पदे

राज्यात एकूण सात महसूल विभाग असून या महसूल विभाग अंतर्गत वन विभागाचे ११ वनवृत्त आहे. यात वनवृत्त निहाय नागपूर ३१, औरंगाबाद १०, पुणे ११, अमरावती १०, नाशिक ९, कोकण ६ अशी एकृूण ७७ पदे विभागीय वनाधिकाऱ्यांची रिक्त आहेत. यामध्ये नक्षलग्रस्त गडचिराेली भागात २० पदे डीएफओंची रिक्त असल्याचे वास्तव आहे.सहायक वनसंरक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

विभागीय वनाधिकाऱ्यांची ७७ पदे रिक्त आहेत. तथापि, ७८ सहायक वनसंरक्षकांना अद्यापही पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. वन विभागात गत महिन्यात पदोन्नती निवड समितीची बैठक आटोपली. मात्र, पदोन्नतीतील पात्र सहायक वनसंरक्षकांनी महसूल विभागातंर्गत मागणी केल्याने निवड यादी वेटिंग आहे. पण येत्या १५ दिवसात सहायक वनसंरक्षकांना डीएफओ म्हणून पदोन्नती मिळेल, असे संकेत आहेत.