शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कोरोनामुळे ग्रामसभा आयोजनास स्थगिती; ग्रामविकासचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:26 IST

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचयातींना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यासंदर्भात १२ मे रोजी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला आदेश प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभाचे आयोजन करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्याच्याविरूद्ध कार्यवाहीची तरतूद आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणू कोविड-१९ हा आजार वैश्विक महामारीच्या स्वरुपात संपूर्ण जगात पसरलेला आहे. या आजाराला रोखण्यासाठी विविध जिल्ह्यात सदर विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार सध्या शाळा, कार्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, जलतरण आदी ठिकाणी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कोविड-१९ च्या संसर्गजन्य आजरामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेतमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रादुभार्वाच्या दृष्टीने योग्य नाही. केंद्र व राज्य शासनाचे आदेश हे अशा प्रकारच्या सभा घेण्यास प्रतिबंध करतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र.)च्या कलम ७ नुसार ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत. सदर आदेश हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच मंगळवार १२ मे पासून अंमलात आला असून, एक वर्ष किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांच्या आयोजनास शासनाने स्थगिती दिली आहे. याबाबत १२ मे रोजी आदेश प्राप्त झाले. त्यानुसार अंमलबजावणीबाबत बीडीओ, विस्तार अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.- दिलीप मानकर,डेप्युटी सीईओ पंचायत

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस