लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी २०१९ परीक्षा १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पाच पेपरच्या तारखा बदलल्या आहेत. नवे परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये असलेल्या वर्धा, यवतमाळ-वाशिम, रावेर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. ११, १८ व २३ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी यापूर्वी विद्यापीठाने घोषित केलेल्या परीक्षा बाधित होणार असल्याने विद्यापीठ प्रशासनाने मतदान आणि मतमोजणी तारखांच्या अनुषंगाने परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार बी.कॉम सेमिस्टर-३ हा पेपर २० मे रोजी घेण्यात येणार आहे. एलएलबी ५ वर्षीय सेमिस्टर-१ पेपर २० मे, तर एलएलबी पाच वर्षीय सेमिस्टर-१ व ३ हे पेपर २० मे रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बी.फार्म. न्यू कोर्स-१ व ३ हा पेपर १ जून रोजी घेतला जाणार आहे. एम. फार्म. न्यू कोर्स सेमिस्टर-१ हा पेपर २७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय झाला. मंगळवारी पाच पेपरच्या वेळापत्रकात बदल क रून संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन विभाग.
निवडणुकीमुळे पाच विषयांचे पेपर लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:44 IST
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी २०१९ परीक्षा १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पाच पेपरच्या तारखा बदलल्या आहेत. नवे परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
निवडणुकीमुळे पाच विषयांचे पेपर लांबणीवर
ठळक मुद्देउन्हाळी परीक्षा : संकेत स्थळावर नवे वेळापत्रक