लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोव्हेल कोरोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता मध्य रेल्वे मुंबई विभागाने सर्वच रेल्वे स्थानकावर 'अलर्ट' जारी केले आहे. आजारी प्रवाशांनी प्रवास टाळा, स्वच्छता ठेवा, असे जनजागृतीपर पोस्टर्स लावले आहेत. रेल्वेस्थानक अथवा प्लॅटफॉर्मवर अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्र्वसनसंस्थेशी निगडित असल्याने यापासून काय काळजी घ्यावी, हे रेल्वे स्थानक अथवा परिसरात लावलेले पोस्टर प्रवाशांना मार्गदर्शक ठरत आहे. सर्दी, खोकला, श्र्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळतात, असे पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या आजाराच्या अनुषंगाने ५० वर्षांवरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, किडनी व गंभीर आजारी रूग्णांनी शक्यतोवर प्रवास टाळावा, असे आवाहन या पोस्टर्सद्वारा करण्यात आले आहे. शिंकताना, खोकलताना रूमाल धरावा. चेहरा, नाक, डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नका, असे पोस्टरवर नमूद आहे.कोरोना विषाणू संदर्भात प्रवाशांना उद्घोषणा कक्षाद्वारे जनजागृती केली जात आहे. स्वच्छता ठेवणे, रूग्ण प्रवाशांनी प्रवास टाळावा आदी माहितीवर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.- महेंद्र लोहकरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक
रेल्वेतही जनजागृतीचे पोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST
कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्र्वसनसंस्थेशी निगडित असल्याने यापासून काय काळजी घ्यावी, हे रेल्वे स्थानक अथवा परिसरात लावलेले पोस्टर प्रवाशांना मार्गदर्शक ठरत आहे. सर्दी, खोकला, श्र्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळतात, असे पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
रेल्वेतही जनजागृतीचे पोस्टर
ठळक मुद्देप्रवाशांना उद्घोषणाद्वारे सूचना : आजारी असाल तर प्रवास टाळा