शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

तोडफोडीनंतर मध्यरात्री मृतदेहाचे शवविच्छेदन

By admin | Updated: November 4, 2014 22:32 IST

सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान संतापलेल्या नातेवाईकांनी पारश्री हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केल्यानंतर मृत मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करु देणार नाही,

अमरावती : सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान संतापलेल्या नातेवाईकांनी पारश्री हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केल्यानंतर मृत मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करु देणार नाही, असा पावित्रा घेतला होता. मात्र लोकप्रतिनिधी व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरुंनी मृताच्या नातेवाईकांची समजूत काढल्यावर तणाव निवळला आणि मध्यरात्री मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची तक्रार पारश्री रुग्णालयांच्या संचालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजतादरम्यान दाखल केली. जमील कॉलनी परिसरातील रहिवासी मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांना १६ आॅक्टोबर रोजी पारश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी नेताच त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुन्हा पारश्री रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तपासणीअंती मुनिफा बी यांना डॉक्टराने मृत घोषित केले. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड सुरु केली. रुग्णालयातील डॉक्टरांचे कक्ष व आतील काचांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे खापर्डे बगिच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी रुग्णालयीन परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता.