अमरावती : मान्सून केरळ ओलांडून तामिळनाडूमध्ये पोहोचला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्याच प्रभावाने विदर्भात ९ जुन रोजी दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळ व त्यानंतर १० ते १२ जूनदरम्यान बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञानी वर्तविला आहे. उन्हाळा संपला की मान्सूनच्या पावसाचे वेध लागतात. अद्याप मान्सून महाराष्ट्रापर्यंत पोहोचला नाही. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने वातावरणात थोडासा गारवा निर्माण केला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी आल्हादायक पाऊस पडला. पावसांच्या सरी कोसळल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हा काळा ढगांनी आच्छादल्याने काही प्रमाणात उन्हाच्या झळापासून थोडा दिलासा मिळाला आहे. त्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणा गारवाही निर्माण झाला. येत्या दोन दिवसात मान्सून अरबी समुद्र, कर्नाटक, रायल सिमा, किनारी आंध्र आणि मध्य बंगालच्या उपसागरात पोहचणार आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आता तिव्र दाबाच्या क्षेत्रात परिवर्तीत झाले व ते उत्तर पश्चिमेकडे सरकत आहे. त्यातच मुंबईपासून ५९० किलोमीटर अंतरावर ओमानकडे असलेला तीव्र दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासात चक्रीवादळात रुपांतरित होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञाने दिले आहे. तटीय आंध्र प्रदेशात चक्राकार वारे वाहत आहेत. हिमालयीन पश्चिम बंगाल ते किनारी ओडिसापर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे. यासर्व परिस्थीतीमुळे येत्या दोन दिवस दुपारीच विदर्भात विजेच्या गडागटासह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.वादळाचा परिणाम मान्सूनवर होऊ शकतोअरबी समुद्रात तयार होणारे वादळ गुजरात आणि ओमानच्या दिशेने सकरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे मान्सुनवर त्याचा कसा परिणाम होईल हा अभ्यासाचा विषय हवामान तज्ज्ञासमोर उपस्थित झाला आहे.
वादळी पावसाची शक्यता
By admin | Updated: June 9, 2015 00:35 IST