शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर पोपटांची शाळा

By admin | Updated: May 21, 2016 23:58 IST

राजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर दररोज सायंकाळी पोपटाची शाळाच भरते.

नागरिकांमध्ये उत्सुकता : शहराच्या चारही दिशेने उतरतात थवेच्या थवे वैभव बाबरेकर अमरावतीराजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर दररोज सायंकाळी पोपटाची शाळाच भरते. शहराच्या चारही बाजूने तेथील वृक्षांवर पोपटाचे थवेच्या थवे उतरत असल्यामुळे हा क्षण बघण्यासाठी नागरिकांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. बहुतांश पक्ष्यांच्या प्रजाती या जंगलातील अधिवास करतात. सर्वसाधारण दिसणारे काही पक्षीच शहरी वस्त्यांमध्ये आढळून येतात. साधारणत: पक्ष्यांची नियमित दिनचर्येत पहाटेपासून सायंकाळपर्यंत राहते. पहाटेपासून ते अन्नाच्या शोधात निघतात. या वृक्षावरून त्या वृक्षावर फिरून फळामधून ते भूक भागवितात. त्यानंतर रात्र होण्यापूर्वीच ते आपआपल्या अधिवासात परत येतात. ही बाब नियमितपणे सुरू असल्यामुळे ते जेथून परत गेलेत त्याच ठिकाणी परत येतात. यामध्ये पोपटांचाही सहभाग आहे. पोपट हा बोलका पक्षी असल्यामुळे अनेक नागरिक त्याला पिजऱ्यांत ठेवतात. पक्ष्यांना पिजऱ्यांत ठेवणे गुन्हा आहे. मात्र आजही अनेकांच्या घरी पोपट बंदीस्त असल्याचे आढळतात. पोपटांची राजापेठ ठाण्याच्या वृक्षावर जणू शाळाच भरते. सायंकाळ होताच शहराच्या चारही बाजूने पोपटाचे थवेच्या थवेच राजापेठ ठाण्यातील वृक्षावर उतरतात. पोपटाचा एकच किलबिलाट सायंकाळी होतो. यावेळी तब्बल ३ ते ४ हजार पोपटांचा किलबिलाट वृक्षावर असतो. वर्षानुवर्षे हे पोपट परंपरागत वृक्षावर अधिवास करीत आहेत. त्यामुळे त्यांची दिनचर्या तेथूनच सुरू होते. राजापेठ पोलीस ठाणे हे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते. पक्ष्यांनाही ही जागा सुरक्षित वाटणे हे एक आश्यर्चच म्हणावे लागेल. मध्यवस्तीत असणाऱ्या राजापेठ ठाण्याच्या परिसरात सतत नागरिकांची वर्दळ असते. तरीसुद्धा या लोकगर्दीत पक्ष्याला सुरक्षिततेची जाणीव होते, हे नवलच आहे. पक्षी अभ्यासक जयंत वडतकर यांच्या मते पोपट हे पक्षी विविध वृक्षांच्या ढोलीत घरटे करतात. मात्र, ते केवळ ढोलात अंडी देण्यापुरते वास्तव्यास असतात. त्यांची दिनचर्या ही वृक्षावरच असते. दिवसभर विविध वृक्षांवरच अन्न शोधणे व रात्रीला परत मूळ वास्तव्यातील वृक्षाच्या फाद्यांवर झोपणे हीच त्यांची दिनचर्या. राजापेठ ठाण्यासह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वृक्षांवरही सर्वाधिक पोपट राहतात. या दोनच ठिकाणी सर्वाधिक पोपटाचे अधिवास असल्याचे आढळून आले आहे.पोपट या पक्ष्याची दिनचर्या वृक्षांवरच असते, वृक्षांच्या ढोलीत अंडी देण्यापुरते ते राहतात. त्यानंतर अन्नाचा शोध घेणे आणि पुन्हा मूळ अधिवास असणाऱ्या वृक्षावर रात्र काढणे ही त्यांची नियमित दिनचर्या असते. शहरातील राजापेठ ठाणे व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वृक्षांवर हजारो पोपटांचा अधिवास पहावयास मिळत आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक.