शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

प्रगत तंत्राव्दारे बहरली डाळिंबे

By admin | Updated: March 14, 2015 00:42 IST

कृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीकृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे. मूळचे तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना बाजार येथील सध्या शहरात स्थायिक झालेले राजेश महादेवराव कुरळकर यांची बोरगाव (धर्माळे) येथील १० एकरातील डाळांबाची बाग पाहिल्यावर याची प्रचिती येते. शेती करायची, परंतु ध्येय समोर ठेवून, यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र पालथा घातला. शेकडो बगीच्यांना भेटी दिल्यात, चर्चा केली व फक्त डाळिंबाची लागवड करायचा निश्चय केला. यासाठी वाशीम जिल्ह्यातील बागायतदार कुलदीप पाटील यांचा सल्ला मोलाचा ठरला. सध्या त्यांनी लागवड केलेली डाळिंबाची ३ हजार झाडे दीड वर्षांची झाली आहेत. पहिला बहर आला असून एका झाडाला सध्या १०० ग्रॅम वजनाची ७५ ते १०० फळे आहेत. या बहराला बाजार भाव योग्य मिळाल्यास ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माळरानात नव्हे पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या बगीच्यात तर आपण उभे नाही, असा भास व्हावा, अशा प्रकारे डाळिंबाचा बगीचा बहरला आहे. वास्तविकत: कुरळकर यांचा व्यवसाय ठेकेदारीचा. परंतु शेती करायचीच असा निश्चय करुन त्यांनी नांदगाव पेठ लगतच्या बोरगाव (धर्माळे) या शिवारात १० एकर शेती विकत घेतली. ही मध्यम स्वरुपाची जमीन. येथे विहीर खोदून ३००० भगवा वानाची डाळिंबाची रोपे जालना येथून आणली. दोन रोपांच्या मधात १० फुटाचे अंतर व १४ फुटाचा रस्ता मशागतीसाठी अशी लागवड केली. खासगी कृषी कन्संल्टंटचा सल्ला ते घेतात. दर दोन आठवड्यांनी त्यांची भेट व मार्गदर्शन त्यांना मिळते. शेती करायची परंतु, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुनच असे मनाशी ठाम ठरवून सुरूवात केली. दररोज सकाळी ७ त ११ पर्यंत ते स्वत: राबतात. रोपांना ड्रिप पद्धतीने सिंचन करण्यात येते. सेंद्रीय खत, गांडूळ खत, शेणखत याचाच वापर करण्यात येतो. निंबोळी अर्काचा फवारादेखील मारण्यात येतो. यासाठी त्यांनी गांडूळ खताचा प्लाँट शेतात तयार केला आहे. मशागतीसाठी छोट्या ट्रॅकरचा वापर करण्यात येतो. कीटकनाशक फवारणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला ‘ब्लोअर’ यंत्र जोडून फवारणी करण्यात येते. सध्या ही झाडे दीड वर्षांची झाली आहे. वर्षाला तीन बहर डाळींबाचा येतात. यामध्ये पाणी मुबलक असल्यास हस्त, कमी असल्यास मृग व आंबिया बहर उपयोगाचा असतो, असे त्यांनी सागितले. सुरूवातील उत्पादन खर्च येतो. परंतु हा उत्पादन खर्च पहिल्याच बहरात निघतो. नंतर झाडांची वाढ होते. फळांच्या संख्येतही वाढ होते. त्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. मात्र उत्पन्न अधिक आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा सहकार्याने शेतीमधून हमखास असे उत्पन्न घेता येते. पहिला बहर एकरी किमान ५ लाखांचे उत्पन्न देतो. दरवर्षी फळांची संख्या वाढून कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न घेता येते, असे त्यांनी सांगितले.पहिले नियोजन, मग सुरूवातपहिले नियोजन करावे व मग सुरूवात करावी, हा यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. शेती करायची तर काय करावे, यासाठी राज्यात ३००० किमी फिरलो, प्रगत शेती आपल्या भागात कशी करता येईल याचे नियोजन केले. डाळिंबाची बाग करायची असे मनासी ठाम करुन सुरूवात केली. दरदिवशी किमान सहा तास शेतीला देतो. नंतर इतर व्यवसाय सांभाळतो. शेतीचे दर दिवसाचे नियोजन ठरले आहे. दर १५ दिवसांनी खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेतो. पहिलाच बहर आला आहे. लोकं भेट देतात, योग्य भाव न मिळाल्यास स्वत: मार्केटिंग करु ६० ते १०० रुपये किलोपर्यंत भाव आहे. या अंदाजाने किमान ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. जिल्ह्यातील युवकांनी पारंपरिक शेतीसोबत प्रगत कृषितंत्रज्ञानाचा वापर करावा, असे राजेश कुरळकर यांनी सांगितले.१८ महिन्यांनंतर बहराला सुरूवातसंत्र्याचे उत्पादन साधारणपणे पाचव्या वर्षांपासून सुरू होते. याउलट डाळिंबाला २५ ते १८ महिन्यांनंतर पहिला बहर घेता येतो. यासाठी तंज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार झाडाची फवारणी करुन पानगळ करावी लागते. दोन आठवड्यांनंतर झाडाला फुले येण्यास सुरूवात होते. झाडाच्या क्षमतेनुसार फुले ठेवावी. कुरळकर यांच्या शेतातील दीड वर्षांच्या एका झाडाला साधारणपणे ७५ ते १०० फळे आहेत. एका फळाचे वजन १०० ग्रॅम आहे. फळाच्या दर्जाची काळजी घ्यावी लागते. दररोज काय काम करावे, याचा तपशील तयार आहे.