शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सकाळपासून प्रदूषण अन् कर्णकर्कश्श आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग होऊ लागली आहे. नातेसंबंधावर त्याचा परिणाम पडू लागला आहे, अशी तक्रार त्या भागातील रहिवाशांंची आहे.

ठळक मुद्देघरी मिळे ना क्षण शांततेचे : चिवडा कारखान्याने केले जगणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘तुमची पहाट झुळझुळ वाऱ्याने आणि शुद्ध हवेने होते ना? सकाळची मंजुळ शांतता तुम्हाला रोज ताजेतवाने करते ना? पण, आमचा हा नैसर्गिक अधिकार गेली अनेक वर्षे हिरावून घेण्यात आला आहे. नाकातून थेट मेंदूत जणारा उग्र वास, प्रदूषित झालेली हवा, डिझेलचा धूर आणि यंत्राचा कर्णकर्कश्श आवाज हीच आमच्यासाठी सकाळ आहे.’श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग होऊ लागली आहे. नातेसंबंधावर त्याचा परिणाम पडू लागला आहे, अशी तक्रार त्या भागातील रहिवाशांंची आहे.तक्रारीनुसार, जैन चिवडा नावाने अमरावतीत वितरित केले जाणारे चिवड्याचे उत्पादन त्या कॉलनीतील एका राहत्या घरात केले जाते. गृहउद्योगाच्या नावावर सुरू करण्यात आलेला सदर उद्योग आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच यंत्रांचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे. यंत्रांसाठी डिझेलचा वापर सुरू झाला आहे. चिवड्यातील घटक तळण्यासाठी तेल वापरले जाते. उकळत्या तेलाची वाफ, डिझेलचा धूर, चिवड्याचे हवेत पसरणारे कण यामुळे असह्य वास परिसरात धुमसत राहतो. यंत्रांच्या आवाजामुळे कानठळ्या बसतात. विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. वयस्कांना गुदमरल्यासारखे होते. प्रकृती बिघडलेली असताना घरात राहणे नकोनकोसे होते. आपल्याच घरात शांत, निवांत दोन क्षण बसता येत नाही. पदरमोड करून, पोटाला चिमटा घेऊन, आम्ही हयातभराची मिळकत तेथे घर उभे करण्यात घालविली आणि त्या नियमबह्य कारखान्याने आमचे आयुष्यच असे अडगळीत आले आहे.लॉकडाऊनमध्येही उत्पादन सुरूचसदर कारखाना टाळेबंदीच्या काळातही सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी प्रशासनाला केली आहे. या कारखान्यात नियमित १० कामगार येत असून, मालाची ने आण करण्यासाठी सतत मनुष्य आणि वाहनांचा राबता असतो. त्यामुळे कोविडच्या नियमावलीला हरताळ फासला गेला, शिवाय रहिवासी भागात सतत बाहेरील लोकांचा राबता असल्याने असुरक्षितताही निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.मागणी काय?छाया गजानन चुंबळे यांच्या मालकीचा तो कारखाना आहे. तो रहिवासी भागात आहे. सदर कारखाना चुंबळे यांनी औद्यागिक क्षेत्रात हलवावा. ते स्वत:हून हलवित नसतील, तर प्रशासनाने त्यांना तशी सक्ती करावी. रहिवासी भागात सुरू असलेल्या उद्योगाला तात्काळ सील लावावे.साऱ्यांनाच केल्या तक्रारीजिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री, पोलीस ठाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका अशा साºयांकडेच तक्रारी करून चुकलो. थातूरमरतूर कारवाई केली, की पुन्हा सारे 'जैसे थे'.१० दिवस सीलतक्रार केल्यावर महापालिकेने कारखान्याला १० दिवसांसाठी सील लावले खरे; परंतु नंतर ते उघडले कसे, हे गूढच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तोशेरे ओढले आहेत.आवाज येतो ते खरे आहे; तथापि त्यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत. दुर्गंधी आणि धूर मात्र निघत नाही. लहानसा गृहउद्योग आहे. केवळ चार तास काम होते. आमचा व्यवसाय नियमसंगत आहे. नागरिकांनी आमच्याशी चर्चा करावी. आमच्यावर कर्ज आहे. उद्योग हलविला तर ते कोण फेडणार?- छाया चुंबळे, चिवडा उत्पादककोण घेणार दखल?एका वस्तीतील नागरिक एका उद्योजकाने वेठीस धरले आहेत. अखेरपर्यंत लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. जिल्हाधिकारी सांगतात, हा विषय महापालिकेचा आहे; महापालिका कायमस्वरूपी उपाय योजत नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ अहवाल देते, आमदार रवि राणा हे 'हो बघतो' असे केवळ आश्वासन देतात. विषय अखत्यारीत येत नाही, असे राजापेठ पोलीस सांगतात. कर्तव्याला जागून या मुद्द्याची दखल कोण घेते, हे कळेलच.

टॅग्स :Socialसामाजिक