शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सिंचन प्रकल्पांकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवी नऊ कोटींची बँक गॅरंटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:31 IST

पर्यावरणविषयक मंजुरीत अडकलेल्या वासनी, गर्गा आणि बोर्डी नाला प्रकल्पांना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नऊ कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देवासनी, गर्गा, बोर्डी प्रकल्प रखडलेअचलपूर, मेळघाटातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कअनिल कडूअमरावती : पर्यावरणविषयक मंजुरीत अडकलेल्या वासनी, गर्गा आणि बोर्डी नाला प्रकल्पांना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नऊ कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. ही बँक गॅरंटी दिल्यानंतरच जलसंपदा विभागास या तिन्ही प्रकल्पांचे काम सुरू करता येणार आहे. पर्यावरणविषयक मंजुरीअभावी या प्रकल्पांचे काम तीन वर्षांपासून बंद पडले आहे.अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्पासाठी ३.७५ कोटी, धारणी तालुक्यातील गर्गा प्रकल्पास २.४७ कोटी, तर चांदूर बाजार तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पास २.५७ कोटींची बँक गॅरंटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे भरावयाची आहे. पर्यावरण (एसईआयएए) समितीने या तिन्ही प्रकल्पांना २५ जानेवारी २०१९ रोजीच्या पत्रानुसार पर्यावरणविषयक मान्यता दिली. मात्र, ती मान्यता देताना त्यांनी बँक गॅरंटीची अट घातली आहे. रकमेचा भरणा केला नसल्याने तालुक्यातील हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत.यासाठी हवी बँक गॅरंटीप्रकल्प बांधकामामुळे होत असलेले प्रदूषण व पर्यावरणविषयक नुकसान भरून काढण्याकरीता प्रत्येक प्रकल्पस्थळी नऊ प्रजातींची झाडे लावून पुढील तीन वर्षे त्यांचे संगोपन करण्याची, त्यांना जगवून मोठे करण्याची जबाबदारी या प्रकल्पांवर टाकण्यात आली आहे. यात कडुनिंबाच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासोबतच कांचन (आपटा), शिसव (शिसम), शिरस, बाभूळ, धरंग, चिंच, ग्लिरिसिडिया, कॅसिया आदी नऊ प्रजातीची झाडे प्रकल्पस्थळी व परिसरात प्रकल्प यंत्रणेला लावावी लागणार आहेत. त्यापोटी ही बँक गॅरंटी घेतली जात आहे.खातरजमा झाल्यानंतर परतलावलेल्या झाडांची तपासणी व प्रत्यक्ष पाहणी तीन वर्षानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे केली जाणार आहे. निर्धारित संख्येनुसार संबंधित प्रजातींची झाडे मोठी होऊन जिवंत आढळून आल्यास सिंचन मंडळाकडून घेतलेली बँक गॅरंटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंचन मंडळास परत करणार आहे. अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्पस्थळी ८९१ झाडे तोडली जातील. या ८९१ झाडांच्या बदल्यात २५ हजार झाडे प्रकल्प यंत्रणेला लावावी लागणार आहेत. यात कडुनिंबांची नऊ हजार, तर उर्वरित आठ प्रजातींच्या प्रत्येकी दोन हजार झाडांचा समावेश आहे.धारणीतही होणार वृक्षारोपणधारणी तालुक्यातील गर्गा मध्यम प्रकल्पावर १ हजार ९३ झाडे तोडली जाणार असून, या झाडांच्या बदल्यात प्रकल्प यंत्रणेला ४ हजार ५०० झाडे लावावी लागणार आहेत. यात झाडांच्या नऊ प्रजातींच्या प्रत्येकी ५०० झाडांचा समावेश आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बोडीर् नाला प्रकल्पावर एकूण पाच हजार झाडे प्रकल्प यंत्रणेला लावावी लागणार आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास बँक गॅरंटी दिल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करता येणार आहे. वासनी आणि गर्गा प्रकल्पाच्या बँक गॅरंटीकरिता ६ कोटी २८ लाख ७६ हजार रुपये निधी आवश्यक आहे. बँक गॅरंटी लवकरच दिली जाणार आहे.- उ.ज. क्षीरसागर, कार्यकारी अभियंता, अमरावती 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प