शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजप-सेनेत कुरघोडीचे राजकारण

By admin | Updated: February 2, 2015 22:58 IST

‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ असे म्हणत राज्यात सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुंबईपासून तर बांधापर्यंत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेत सोबत असले

अमरावती : ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ असे म्हणत राज्यात सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुंबईपासून तर बांधापर्यंत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेत सोबत असले तरी एकमेकांना पाण्यात पाहण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. हे केवळ मंत्रालयापुरतेच सीमित नसून याचे लोण जिल्हास्तरावरही पोहचले आहे. पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दोन-चार दिवसांनंतर भाजप-सेनेच्या मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत.मागील २५ वर्षांपासून भाजप, सेना एकत्र निवडणूक लढवीत असताना यंदा विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन भाजपने सेनेसोबतची युती संपुष्टात आणून ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजपला मिळाला. विधानसभा निवडणुकीत सेनेला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. मात्र सत्तास्थापनेची कसरत सुरु असताना प्रारंभी सेनेने मुख्यमंत्रिपदाची दावेदारी केली. परंतु भाजपने सेनेच्या या मागणीला फार प्रतिसाद दिला नाही. किंबहुना सेनेला वाळीत टाकण्याची रणनीती भाजपने आखली. यात भाजपला बऱ्यापैकी यशसुद्धा मिळाले. अपक्ष, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात सत्ता कायम ठेवण्याची व्यूहरचना आखली. मात्र राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शासन चालविणे म्हणजे सिंचन घोटाळ्यावर पांघरुण घालणे होय, अशी प्रतिक्रिया राज्यभर गाजू लागली. परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपची कानउघाडणी करीत सेनेला सत्तेत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भाजपने हो-नाही करीत सेनेला दुय्यम दर्जाची खाती देत सत्तेत सामावून घेतले. भाजप नेत्यांची इच्छा नसताना सेनेला सत्तेत घेतले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात सेनेने-भाजप नेत्यांवर केलेल्या आरोप, प्रत्यारोपाच्या जखमा अद्यापही गेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक काबीज करण्याची रणनीती भाजपने रचली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवून सेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील भाजप, सेनेच्या कुरघोडीचे राजकारण संपूर्ण राज्यात पोहचले आहे. एकीकडे भाजपने सदस्य नोंदणीला जोरदार सुरुवात केली असून मंत्रीगण भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी बळ उभे करीत आहे. भाजपने पक्ष बांधणीत मुसंडी मारल्याने सेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीत पराभवाची कारणमीमांसा शोधत असताना जुन्या, नवीन शिवसैनिकांना बळ देण्याचे काम करीत आहेत. शुक्रवारी ना. कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा करुन ‘उद्धव पॅटर्न’ समजावून सांगितला आहे. अमरावती जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही राहिल, असा कानमंत्र देत आपसातील हेवेदावे दूर करण्याचा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. सेना असेल तर आपण राहू, त्यामुळे अंतर्गत वाद बाजूला सारा, एकदिलाने काम करा, असे म्हणत ना. कदम यांनी शेतकरी, शेतमजूर, सामान्यांपर्यंत सेना पोहचविण्यासाठी शासन योजनेचा आधार घेण्याचे सांगितले. यापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सुद्धा अमरावतीत येऊन गेलेत. एका सत्कार सोहळ्यातून सेना बांधणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. भाजपची घोडदौड रोखण्यासाठी शिवसैनिकांना ‘चार्ज’ करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरु झाले आहेत. ज्या जिल्ह्यात भाजपचे मंत्री येऊन गेले, त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्याच जिल्ह्यात सेनेचा मंत्री पाठवून नियोजन आखत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. भाजप-सेनेत राजकीय कुरघोडी ही विदर्भात सर्वाधिक दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपच्या बाजूने राहिल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले आहे. आघाडी शासनाच्या काळात मंत्र्यांचे लालदिवे हे कधी, कधी दिसून यायचे. मात्र आता अमरावती, अकोला व नागपुरात मंत्र्यांच्या लालदिव्यांची जणू मांदियाळीच सुरु असल्याचे चित्र आहे. विशेषत: सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे तसेच राज्याचे गृह, सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांचे अमरावती आणि अकोला हे ‘घर आंगण’ झाले आहे. या दोन्ही राज्यमंत्र्यांनी भाजप सदस्य नोंदणीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. गत आठवड्यात केंद्रीय रासायनिक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी अमरावतीत येऊन भाजप सदस्य नोंदणीचा आढावा घेतला आहे.