शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अमरावती जिल्ह्यातील येवदा येथील पोलीस महिलेचा मृत्यू; कोरोना अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:19 IST

स्थानिक पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेचा नागपूर येथे शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वी घेतला होता थ्रोट स्वॅब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्थानिक पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेचा नागपूर येथे शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिला सात महिन्यांची गर्भवती होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असताना त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला होता. त्याबाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.पोलीस महिलेने ३० मार्च रोजी येवदा पोलीस ठाण्यात सेवा बजावली. ३१ मार्च रोजी त्यांची सुटी होती. १ एप्रिल रोजी गर्भारपणामुळे अस्वस्थ वाटल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने त्यांची प्राथमिक तपासणीही करण्यात आली. त्यांचा थ्रोट स्वॅब काढून तो नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान, १ व २ एप्रिल रोजी इर्विनमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना ३ एप्रिल रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दुपारी ४.१५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, न्यूमोनिया झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या कॉज आॅफ डेथमध्ये म्हटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.१ एप्रिल रोजी त्या स्वत: इर्विनला गेल्या होत्या. त्याच दिवशी त्यांचा थ्रोट स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्या गर्भार होत्या. त्यांचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे नागपूर जीएमसीमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.- बाळकृष्ण पावरा, ठाणेदार, येवदा

टॅग्स :Deathमृत्यू