शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
3
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
6
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
7
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
10
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
11
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
12
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
13
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
14
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
15
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
16
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
17
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
18
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
19
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार पटेलांच्या घरात पोलिसांचे सर्च आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:39 IST

खारी येथील पोलीस वाहनावर हल्ला चढविल्याप्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणी येथील घराची पोलिसांनी अटक करण्यासाठी झाडाझडती घेतली.

ठळक मुद्देदोघांना जामीन : अचलपूर न्यायालयातून दोघांना अटक

आॅनलाईन लोकमतधारणी : खारी येथील पोलीस वाहनावर हल्ला चढविल्याप्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणी येथील घराची पोलिसांनी अटक करण्यासाठी झाडाझडती घेतली. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शुक्रवारी राजकुमार पटेलांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय अचलपूर येथून खारीज करण्यात आल्यानंतर शनिवारी ही कारवाई करण्यात आली.शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अचलपूर येथे चार आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय झाला. यात दोघांना जामीन मिळविण्यात यश आले, तर दोघांचा अर्ज खारीज झाल्याने त्यांना अचलपूर येथेच अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये गोलू ऊर्फ संजय बाबूलाल कापसे (३६), मिश्रीलाल मोतीलाल कापसे (५५) यांचा समावेश आहे. ज्यांना अटकपूर्व जामीन मिळाला त्यांचे नाव मुकेश कैलास इंगळे व राजेश कैलास इंगळे (दोन्ही रा. अंबाडी, ता. धारणी) असे आहे.शुक्रवारी अचलपूर न्यायालयातून जामीन अर्ज खारीज झाल्यापासून माजी आमदार राजकुमार पटेल हे पसार झालेत. पोलीस त्यांची पाळत ठेवत असतानाच त्यांनी फरार होण्यात यश मिळविल्याने पोलिसांच्या पदरी पुन्हा निराशा आली. शनिवारी सकाळी पोलीस ताफा ठाणेदार किशोर गवई यांच्या नेतृत्वात राजकुमार पटेल यांच्या घरी ११ वाजता पोहोचले. त्यांनी घराचा संपूर्ण शोध घेतला. मात्र, राजकुमार पटेल न सापडल्याने पोलिसांची धडपड सुरूच आहे.दोघांना अटकपूर्व जामीनपोलिसांकरिता अत्यंत महत्वाचे असलेले या प्रकरणात दोन आरोपींना अटकपूर्व जामीन प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यांची बाजू अ‍ॅड. राम शुक्ला आणि संदीप ठाकूर यांनी यशस्वीरित्या मांडीत त्यांची जामीन मिळविली. या प्रकरणी सहा आरोपी तुरूंगात असून त्यावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. यात तीन महीला आरोपींचा समावेश आहे. आता सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.