परतवाडा : आगामी बकरी ईदनिमित्त परतवाडा शहरात पोलिसांनी रूट मार्च केला. यादरम्यान परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात रूट मार्चसह दंगा काबू योजना घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे, ठाणेदार सदानंद मानकर यांच्यासह सहा अधिकारी व ४२ कर्मचारी, आरसीपीचे २२ कर्मचारी, अचलपूर पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व १० अंमलदार, सरमसपुरा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व सहा अंमलदार, शिरजगाव पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार, चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार, ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार असे एकूण १२ अधिकारी व ९५ कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले.
परतवाड्यात पोलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST